नागपंचमी पूजन – मंत्र आणि अर्थासह

‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत तसेच सर्वसामान्य लोकांनी ‘नागपंचमी’ची पूजा कशी करावी, पूजा भावपूर्ण व्हावी आणि नागदेवतेची त्यांच्यावर कृपा व्हावी, या हेतूने पुढील पूजाविधी दिला आहे.

सणांशी संबंधित लहरी आणि त्यांचे कार्य

प्रत्येक सणाच्या निमित्ताने पृथ्वीवर विविध प्रकारच्या लहरी कार्यरत होतात, ज्यामुळे ते साजरे करणार्‍यास साधनेसाठी साहाय्य होते. या लहरींविषयीची माहिती जाणून घेऊया.

पांडव पंचमी

द्यूतात कौरवांकडून हरलेल्या पांडवांना कबूल केल्याप्रमाणे १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात काढावे लागले. कार्तिक शुक्ल पंचमीला पांडव अज्ञातवासातून प्रकट झाले. तो दिवस म्हणजे पांडव पंचमी.

सणांच्या निमित्ताने करावयाची सिद्धता

सण साजरे करतांना ते शास्त्र जाणून घेऊन साजरे केल्यास मिळणारा लाभ अधिक असतो. सण साजरा करतांना करायची पूर्वसिद्धता आणि घ्यावयाची काळजी याविषयीचे विवेचन या लेखात केले आहे.

तुळशी विवाह

तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत तसेच या सणाची वैशिष्ट्ये यांविषयी लेखात माहिती देण्यात आली आहे.

देवदिवाळी

कुलस्वामी, कुलस्वामिनी आणि इष्टदेवता यांच्याखेरीज अन्य देवतांचे पूजन करून त्यांना त्यांच्या मानाचा भाग पोहोचविण्याचे कर्तव्य देवदिवाळी या दिवशी पार पाडले जाते.

दिवाळीमध्ये लहान मुले किल्ला का बांधतात ?

काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्‍या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे यांसाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली.

नारळी पौर्णिमा (श्रावण पौर्णिमा)

पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात.