हिंदु संस्कृतीचा प्राण असणार्‍या भगवान सूर्यनारायणाची विविध फलदायी सूर्योपासना !

सूर्योपासना हा भारतवर्षाचा प्राण आहे. आपल्या ऋषीमुनींनी साधना करून सूर्योपासनेचे लाभ मिळवलेले आहेत. रथसप्तमीच्या पावन पर्वावर भगवान सूर्यनारायणाविषयीची सखोल, शास्त्रशुद्ध आणि आध्यात्मिक माहिती पुढे देत आहे.

रथसप्‍तमी

सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी `रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्योपासना करायची असते.