त्रेतायुगातील गुढीपाडव्याविषयी भगवंताने सांगितलेला भावार्थ

कृती – त्रेतायुगातील श्रीरामाच्या स्वागतापासून गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत रूढ होणे

त्रेतायुगात श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येला परतला, तेव्हा अयोध्येतील जनतेने श्रीरामाचे स्वागत करण्यासाठी काठीला रेशमी वस्त्र लावून घरापुढील अंगणात अशा काठ्या उभ्या केल्या.

(टीप : येथे लक्षात घेऊया की गुढी ही विजयाचे प्रतीक असल्याने प्रभु श्रीरामचंद्र विजयी हाेऊन अयाेध्येला परत आल्याच्या प्रित्यर्थ घराघरात गुढ्या उभारण्यात आल्या हाेत्या. तेव्हा लाेकांनी दीप आणि आकाशकंदील लावूनही विजयाेत्सव साजरा केला हाेता. हा काळ दिवाळी म्हणून साजरा केला जाताे. हा दिवस गुढीपाडवा नाही.)

 

भावार्थ – गुढ्या म्हणजे अयोध्येतील जनतेने श्रीरामाच्या
धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक असणे

ज्याप्रमाणे द्वापरयुगात श्रीकृष्णाने करंगळीच्या टोकावर गोवर्धन पर्वत उचलून अवतारी कार्य केले, तेव्हा तेथे उपस्थित असणार्‍या गोप-गोपींनी आपापल्या काठ्या पर्वताला लावून अवतारी कार्यात सहभाग घेतला; त्याचप्रमाणे त्रेतायुगातील अयोध्येतील जनतेची श्रीरामाप्रती निस्सीम भक्ती असल्याने तिने श्रीरामाच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात घेतलेल्या सहभागाचे द्योतक म्हणजे पाडव्याला श्रीरामाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या गुढ्या आहेत.

 

सूक्ष्म – सगुण लोकांत विविध प्रकारे गुढीपाडवा साजरा होत असल्याने
सगुण लोकांमध्ये रहाणार्‍या जिवांच्या उत्तरोत्तर उन्नतीच्या कार्याला गती प्राप्त होणे

ज्याप्रमाणे भूलोकात गुढीपाडवा साजरा केला जातो, त्याच प्रमाणे ब्रह्मांडातील विविध सगुण लोकांमध्येही चैत्र शुक्ल प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. नागलोक, स्वर्गलोक, धर्मलोक, गोलोक, नक्षत्रलोक, पुष्पलोक यांसारख्या लोकांमध्ये पवित्र मानलेल्या वस्तूंना सुशोभित करून गुढ्या उभारल्या जाऊन गुढीपाडवा साजरा केला जातो. धर्मलोकात ब्रह्मध्वज फडकवून, गोलोकात झूल सुशोभित करून, तर पुष्पलोकात पुष्पहार लावून गुढ्या उभारल्या जाऊन गुढीपाडवा साजरा केला जातो. अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा केल्याने प्रजापति-ब्रह्म तत्त्वयुक्त हिरण्यगर्भ लहरींची तारकशक्ती संबंधित लोकांकडे प्रचंड प्रमाणात आकृष्ट होऊन संबंधित लोकांच्या पालनपोषणाचे कार्य सुरळीतपणे चालू राहून संबंधित सगुण लोकांमध्ये रहाणार्‍या जिवांच्या उत्तरोत्तर उन्नतीच्या कार्याला गती प्राप्त होण्यास साहाय्य होते. गुढीपाडवा साजरा केल्याने श्रीविष्णूचा कृपाशीर्वाद लाभून जीव आणि लोक या दोहोंचा उत्कर्ष साधला जातो.

 

नामधारक जिवाच्या अंतःकरणात गुढीपाडवा,
रामनवमी आणि हनुमान जयंती सूक्ष्मातून साजरी होत असणे

हृदयात नामाची गुढी उभारली की, हृदयसिंहासनावर राम आरूढ होऊन हनुमंत रामराज्याची विजयपताका घेऊन अवतरतो; म्हणूनच गुढीपाडव्यानंतर रामनवमी आणि त्यानंतर हनुमान जयंती असा शुभतिथींचा क्रम निर्धारित असतो. अशा प्रकारे प्रत्येक नामधारक जिवाच्या अंतःकरणात सूक्ष्मातून गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी होते.

श्रीकृष्ण (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, चैत्र शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११४ (२३.३.२०१२) रात्री ११.३०)

Leave a Comment