हिंदूंनो, प्रतिकारक्षम व्हा !

‘दसरा म्हणजेच विजयादशमी ! हा दिवस केवळ परंपरेचे गोडधोड खाण्याचा किंवा आपट्याची पाने वाटून तात्पुरता आनंद साजरा करण्याचा नव्हे, तर हा अधर्मावर धर्माच्या आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचा उत्सव आहे. प्रभु श्रीरामाने रावणाचा वध करून याच दिवशी धर्मध्वज फडकवला, महिषासुरमर्दिनी दुर्गेने याच दिवशी दुष्ट शक्तींचे निर्दालन केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी याच मुहूर्तावर ‘सीमोल्लंघन’ केले. या शौर्यशाली इतिहासाचे स्मरण करण्याची आज आवश्यकता आहे.
सध्या ‘मार खातो तो हिंदू’, अशी हिंदूंची दुर्बल व्याख्या होऊन बसली आहे. मग ते शेजारील देशांमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवर होणारे अत्याचार असोत किंवा देशांतर्गत विविध कारणांवरून हिंदूंच्या मिरवणुकांवर होणारे आघात असोत, अनेकदा हिंदु समाज केवळ वाचिक प्रतिक्रिया देणारा किंवा हानी सोसणारा ठरतो. हिंदूंनो, हे लक्षात घ्या की, अन्याय सहन करणे, हे धर्माचे लक्षण नसून दुर्बलतेचे लक्षण आहे. प्रत्येक वेळी आघात झाल्यानंतर शोक व्यक्त करणे किंवा केवळ मूक मोर्चे काढणे पुरेसे आहे का ? याचा अंतर्मुख होऊन विचार करा !
हिंदूंनो, विजयादशमी हे सीमोल्लंघनाचे प्रतीक आहे. आजचे सीमोल्लंघन, म्हणजे हिंदु समाजाने न्यूनगंड आणि पराभवाची मानसिकता यांच्या सीमा ओलांडून आत्मसन्मान अन् शौर्य यांचा अंगीकार करणे होय. प्रत्येकाला स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि संपत्तीच्या रक्षणाचा मूलभूत अधिकार कायद्याने दिलेला आहे, हे लक्षात घ्या अन् येणार्या भीषण काळात स्वतःच्या अन् कुटुंबियांच्या रक्षणासाठी प्रतिकारक्षम व्हा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दसरा (विजयादशमी)
विजयाची गौरवशाली परंपरा जोपासणारी प्राचीन भारतीय शस्त्रास्त्रविद्या !
दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व
१० हा अंक आणि विजयादशमी
हिंदूंनो, धर्मशिक्षणाचा अभाव किंवा धर्मद्रोह यांमुळे होणार्या अपप्रचाराला बळी पडू नका !