चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

या लेखात चातुर्मासातील व्रते-सण यांचा उल्लेख थोडक्यात केला आहे. बहुतेक व्रते स्त्रियांनीच करायची आहेत. संसारात येणार्‍या अनेक अडचणींना त्यांना तोंड देता यावे, हा त्यामागील प्रधान हेतू आहे. ‘ऐहिक सुखापेक्षा पारलौकिक सुखाकडे लक्ष द्या, म्हणजेच फलासक्ती न ठेवता कर्म करत रहा’, हा भगवद्गीतेचा संदेशच वेगवेगळ्या प्रकारे सांगितला आहे.

पांडुरंगाच्या ओढीने वारीत आनंदाने वाटचाल करणारे वारकरी !

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून प्रतिवर्षी लाखो वारकरी आषाढी अन् कार्तिकी एकादशीला पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. ते हरिनामाच्या गजरांत, टाळ-मृदंगाच्या साथीने अनुमाने दोनशे मैल (३२२ कि.मी.) चालत जातात. अशा वेळी त्यांना ना थकवा असतो, ना कशाची काळजी असते !

जिवंतिका पूजन

जिवंतिका पूजन ही पूजा संततीरक्षणार्थ मानली जाते. जिवतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करावी, असे सांगितले जाते. या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे.

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे समोर आले आहे. या पारपत्रावर भाग्यनगर (हैद्राबाद) पारपत्र कार्यालयाचा शिक्का असून पारपत्र प्रदान अधिकारी म्हणून पी. कृष्णा चार्या यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. हे पारपत्र विनोद म्हणून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे.

पांडुरंग आणि एकादशी यांचे माहात्म्य !

आषाढ आणि कार्तिक मासांतील शुक्लपक्षात येणार्‍या एकादशींच्या वेळी श्रीविष्णूचे तत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने श्रीविष्णूशी संबंधित या दोन एकादशींचे महत्त्व अधिक आहे.

देवळांतील यात्रा, जत्रोत्सव भावपूर्ण साजरे करून चैतन्य जोपासा !

देवतांच्या उत्सवाच्या दिवशी वातावरणात अधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असते. या चैतन्याचा लाभ उठवण्यासाठी या जत्रा किंवा उत्सव अत्यंत भावपूर्ण पद्धतीने पार पाडले पाहिजेत.

जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !

जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.

रशियात होलिका दहनासारखा साजरा केला जाणारा मास्लेनित्सा फेस्टिव्हल

रशियात १०२ वर्षे जुना मास्लेनित्सा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला. या फेस्टिव्हलमध्ये लोकांनी ७८ फूट उंच लाकडी घराला जाळले आणि मिठाईचे वाटप करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या पारंपरिक सणाला वसंतऋतूचे आगमन, कुटुंबाशी जवळीक आणि असत्याच्या विजयाच्या प्रतिकाच्या स्वरूपात साजरे करण्यात येते. भारतातील होलिका दहनासारखेच रशियातील या सणाचे स्वरूप आहे.

वैकुंठचतुर्दशी

‘विष्णुभक्ती करण्यासाठी आपल्या सर्वांना मिळालेली अमूल्य संधी म्हणजे ‘वैकुंठचतुर्दशी !’ वैकुंठचतुर्दशी या दिवसाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी सर्व भक्तांसाठी वैकुंठाचे द्वार खुले असते.