समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले अलौकिक कार्य
समर्थ रामदासस्वामी यांनी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक ठिकाणी मठांची स्थापना केली आणि त्यावर आपल्या विचारांशी एकनिष्ठ असणार्या विद्वान, राष्ट्रप्रेमी अन् त्यागी महंतांची मठाधिपती म्हणून नेमणूक केली. त्यांनी सर्व भारतभरात एकूण १ सहस्र १०० मठांची स्थापना केली. ‘हे मठ आणि महंत, म्हणजे समर्थ संप्रदायाचा पाया आहे’, असे म्हटले जाते.