कंबोडिया बौद्ध राष्ट्र असूनही तेथील राजा नरोदोम सिंहमोनी यांच्या राजवाड्यात सर्व चिन्ह ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित असणे !

राजवाड्याचे वैशिष्ट्य असे आहे की, हा राजवाडा चीन आणि फ्रेंच वास्तूशैलीनुसार बांधला आहे; पण राजवाड्यातील सर्व चिन्हे ‘सनातन हिंदु धर्मा’शी संबंधित आहेत. राजवाड्याच्या परिसरात प्रवेश करतांना श्रीविष्णु आणि शिव एकत्र असलेल्या ‘हरिहर’ मूर्ती दिसतात.

इंडोनेशियातील रहदारीच्या चौकांत रामायण आणि महाभारत काळातील पौराणिक कलाकृती, तसेच लोककलांमध्येही हिंदु पौराणिक कथांचा समावेश !

जकार्ता हे शहर मुसलमानबहुल आहे, तरीही तेथील राष्ट्रीय स्मारकाच्या समोरील चौकात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाची मोठी कलाकृती पहायला मिळते.

अझरबैजान या मुसलमानबहुल देशात ३०० वर्षांहूनही अधिक प्राचीन दुर्गा मातेचे मंदिर !

बाकू – हे दुर्गामातेचे मंदिर आहे. या मंदिरात अखंड ज्योती तेवत असल्यामुळे या मंदिराला टेंपल ऑफ फायर असेही संबोधले जाते. ही ज्योती साक्षात भगवती असल्याची भावना भक्तगणांमध्ये आहे. या ठिकाणी प्रतिवर्षी १५ सहस्रांहून अधिक भाविक दर्शनाला येतात..