परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांनी काढलेले उद्गार !

१. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात गेल्या असता एका
हितचिंतकांनी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांची भेट घेण्यास सुचवणे

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देवीची साडी देऊन त्यांचा सन्मान करतांना श्री. नटराज शास्त्री

‘११.३.२०२१ या दिवशी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या कांचीपूरम् येथील श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात गेल्या होत्या. त्या वेळी एक हितचिंतक श्री. सुभाष यांनी त्यांना श्री कामाक्षी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांना भेटण्याविषयी सुचवले. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ देवीच्या मंदिराजवळच असलेल्या पुजार्‍यांच्या घरी गेल्यावर श्री. नटराज शास्त्री यांनी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांचा शाल आणि देवीची साडी देऊन सन्मान केला.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

 

२. श्री. नटराज शास्त्री यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले उद्गार

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२.अ. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी श्री. नटराज शास्त्री यांना
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा त्यांनी पुढील सूत्रे सांगितली.

२.अ.१. हा महान जीव कधी शरिरात असतो, तर कधी नसतो. तो सूक्ष्मातून शरिराच्या बाहेर जाऊन अनेक ठिकाणी कार्य करत असतो. हा जीव मानसरित्या कधीकधी अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाऊन येतो. ‘प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या तिथींना परात्पर गुरु डॉ. आठवले सूक्ष्मातून श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात येऊन देवीशी चर्चा करून जातात’, असे देवी मला सांगत आहे.

(‘काही दिवसांपूर्वी झालेल्या सप्तर्षी जीवनाडीपट्टी वाचनात सप्तर्षींनीही सांगितले होते, ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून शरिरातून बाहेर ये-जा करत असतात.’ – संकलक)

२.अ.२. ‘सूक्ष्मातून शरिराच्या बाहेर जाऊन परत आत येऊ शकतो’, असा एकही अवतारी जीव सध्या या पृथ्वीवर नाही. गुरुदेव डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) हेच असे एकमेव आहेत’, असे मला श्री कामाक्षीदेवी सांगत आहे.

 

३. श्री. नटराज शास्त्री यांनी ‘देवीच्या आज्ञेने देवीचा प्रसाद घेऊन
गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) दर्शनाला आश्रमात येईन’, असे सांगणे

श्री. विनायक शानभाग

आम्ही श्री. नटराज शास्त्री यांना सांगितले, ‘‘भविष्यात तुम्ही रामनाथी आश्रमात अवश्य यावे.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘पुढे शक्य झाल्यावर मी देवीच्या आज्ञेने देवीचा प्रसाद घेऊन गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) दर्शनाला आश्रमात येईन.’’

श्री. नटराज शास्त्री यांच्या माध्यमातून सनातन संस्थेला कांची  येथील श्री कामाक्षीदेवीचा आशीर्वाद मिळाला, त्याबद्दल आम्ही सर्व साधक देवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), चेन्नई (६.४.२०२१)

 

४. श्री. नटराज शास्त्री यांचा परिचय

‘श्री. नटराज शास्त्री कांचीपूरम् येथील कांची कामाक्षी मंदिराच्या मुख्य पुजार्‍यांपैकी एक आहेत. ते ‘श्री विद्या’ (देवी) उपासक आहेत. ते प्रतिवर्षी नवरात्रोत्सवाच्या वेळी कामाक्षी मंदिरात ‘दशमहाविद्या होम’ करतात. त्यांनी आजपर्यंत अनेक प्रसिद्ध राजकारणी, मठाधिपती यांच्यासाठी होम केले आहेत.

Leave a Comment