संपूर्ण विश्‍वात सनातन संस्थेसारख्या अध्यात्म विश्‍वविद्यालयाची आवश्यकता आहे ! – वृंदावन आचार्य नित्यानंद गिरी महाराज

आचार्य नित्यानंद गिरी महाराज आणि त्यांच्यासमवेत आलेल्या साध्वी हरिप्रियाजी महाराज यांनी २४ जानेवारी या दिवशी सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे ! – श्री प्रभु नारायण करपात्री

कुंभमेळ्यातील तिसरी गंगा म्हणजे ‘सरस्वती’ सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातून वहात आहे, असे आशीर्वचन काशी येथील संत श्री प्रभु नारायण करपात्री यांनी सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिले.

सनातनचे साधक संतसेवेत असल्याने त्यांच्या चेहर्‍यावर संतसंगतीचा आनंद दिसून येतो ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज

सनातनच्या सर्व साधकांकडे पाहून पुष्कळ प्रसन्न वाटते. त्याचे कारण म्हणजे ते संतसेवेत असून संतसंगतीचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसून येत आहे, असे प्रतिपादन श्री रघुवीर महात्यागी खालसाचे श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर महंत रघुवीरदास महात्यागी महाराज यांनी येथे केले.

सनातनने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो ! – शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांचे आशीर्वचन

‘सनातन संस्थेने ठेवलेले लक्ष्य साध्य होवो. सनातन संस्थेकडून राष्ट्ररक्षणाचे कार्य होवो’, असे आशीर्वचन जगद्गुरु शंकराचार्य नरेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी कुंभमेळ्यात स्नान केल्यावर दिले.

आगामी प्रयाग कुंभपर्वातील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या धर्मजागृतीच्या कार्यासाठी महामंडलेश्‍वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांचे आशीर्वाद !

गोकुळ, मथुरा येथे सनातन संस्थेच्या वतीने श्री उदासीन कर्ष्णी आश्रमाचे महामंडलेश्वर स्वामी श्री शरणानंदजी महाराज यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.

सनातन संस्था आणि हिदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगली येथील पू. पारसनाथजी महाराज आणि श्री त्रिशुलभारतीगुरुजीवनभारती महाराज यांची सदिच्छा भेट

सांगली बत्तीस शिराळा येथील श्री गोरक्षनाथ मंदिराचे मठाधिपती पू. पारसनाथजी महाराज, तसेच वाळवा तालुक्यातील मौजे जक्राईवाडी येथील श्री त्रिशुलभारती गुरु जीवनभारती महाराज यांची सनातन संस्थेचे साधक श्री. शंकर नरुटे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. भरत जैन यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो ! – प.पू. स्वामिनी मंगलानंदा, अकोला

सनातन संस्था करत असलेली जागृती सर्वांमध्ये होवो. या कार्याच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक पैलूंनुसार हिंदू जोडले जावोत, असे शुभाशीर्वाद प.पू. स्वामिनी मंगलानंदा यांनी दिले.

प.पू. दास महाराज यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प पूर्णत्वाला जाण्यासाठी केलेली प्रार्थना !

प.पू. भक्तराज महाराज, आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे, ‘साधकांना चैतन्यशक्ती आणि बळ द्या. हिंदूंना संघटित होण्याची बुद्धी प्रदान करा अन् तुमचा आशीर्वाद लवकरात लवकर फळाला येऊन हिंदु राष्ट्राची पहाट उजाडू द्या.’– प.पू. दास महाराज, पानवळ, बांदा, जि. सिंधुदुर्ग.

चोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण

संत बालयोगीजी महाराज यांच्या शुभहस्ते सनातन पंचांग – २०१८ आणि सात्त्विक आकाशकंदिल यांचे अनावरण करण्यात आले.सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांचे दर्शन घेतले.

प्रत्येकाने शुद्ध धर्माचरण केल्यास विश्‍व राममय होईल ! – प.पू. श्रीराम महाराज

प्रत्येकाने आद्य कर्तव्य म्हणून सनातन धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्रत्येकाने मनापासून शुद्ध धर्माचरण साधना म्हणून केले, तर संपूर्ण विश्‍व राममय होऊन जाईल, असे प्रतिपादन प.पू. श्रीराम महाराज रामदासी यांनी केले.