गोवा राज्यात सनातन संस्थेचे जाहीर साधना प्रवचन

सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !

कलियुगात ‘नामस्‍मरण’ ही सर्वश्रेष्‍ठ साधना ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्‍यात्‍माचे आचरण केल्‍यानेच प्राप्‍त होतो. जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांचे मूळ कारण हे आध्‍यात्मिक असते.

सनातनच्या वतीने हावडा (बंगाल) येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित प्रवचनाला चांगला प्रतिसाद !

दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. तनुश्री साहा यांनी दत्तजयंतीचे महत्त्व, दत्त नावाची वैशिष्ट्ये, भगवान दत्तात्रयाच्या जन्माचे रहस्य, दत्त उपासनेचे शास्त्र आदी सूत्रांविषयी माहिती दिली.

आनंदी जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष शोधून दूर करणे आवश्यक ! – कु. कृतिका खत्री, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने येथील नूतन मराठी सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षिकांसाठी ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

फरीदाबाद (हरियाणा) येथील गीता महोत्सवामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

फरीदाबाद येथे जिल्हास्तरीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.

कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. सत्संगांत अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

खेड शिवापूर (पुणे) येथील ‘क्राफ्ट पॉवरकॉन’ आस्थापनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन !

‘अध्यात्मानेच व्यक्तीमध्ये पालट होऊ शकतो. आजच्या काळात साधनेविना पर्याय नाही. तुम्ही प्रत्येक मासाला व्याख्यान, आध्यात्मिक प्रवचन घेऊ शकता’, असा उत्स्फूर्त अभिप्राय ‘क्राफ्ट पॉवरकॉन’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला.

धुळे येथे नवरात्रोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

धुळे येथील आई एकविरादेवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनास जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे उद्घाटन मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. सोमनाथजी गुरव आणि सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.