वृंदावन (उत्तरप्रदेश) येथील आचार्य श्री संजीव कपिल यांचे सनातन संस्थेच्या कार्याला आशीर्वाद

वृंदावन (उत्तरप्रदेश) – येथील परमहंस आश्रम वृंदावन आणि आश्रम हरि मंदिर, पटौदी यांचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर श्री स्वामी धर्मदेवजी महाराज यांचे शिष्य आचार्य श्री संजीव कपिल यांची सनातन संस्थेच्या साधकांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी साधकांनी आचार्य श्री संजीव कपिल यांना संस्थेच्या कार्याची माहिती सांगून आशीर्वाद घेतले. सनातन संस्थेचे आध्यात्मिक स्तरावर चालू असलेले कार्य पाहून आचार्यांनी समाधान व्यक्त केले आणि या धर्मकार्याला आशीर्वाद देत साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Comment