सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

नगर – सनातन संस्था निर्मित सात्त्विक उत्पादने ही आपल्याला आपल्या संस्कृतीशी निगडित घटकांची जाणीव करून देणारी, तर सनातनचे ग्रंथ राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे आहेत. ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले. केडगाव येथील श्री रेणुकामाता मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ‘सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ’ यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी देवीचे पुजारी श्री. कुलदीप गुरव, भैरवनाथ मंदिराचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब कोतकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. बापू ठाणगे आणि सनातन संस्थेच्या सौ. मनीषा कावरे आदी उपस्थित होत्या.

Leave a Comment