अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थएकदा श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची एका अधिकारी संतांशी भेट झाली. त्यांची साधना एवढी आहे की, ‘अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ सतत या संतांच्या समवेत सूक्ष्मातून असतात’, असे त्यांनी सांगितले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

या संतांचे आणि त्यांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद गुरुकार्याला अन् सर्व साधकांना मिळाले, ही दत्तगुरूंचीच कृपा ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांकडून एवढी वर्षे साधना करवून घेतली आहे. त्याचे फळ म्हणून अशा संतांच्या आणि उच्च अशा अधिकारी व्यक्तींच्या माध्यमातून देव आता आपल्याला त्याची प्रत्यक्ष देहधारी ऊर्जा देत आहे. ‘या दैवी ऊर्जेनेच सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊन रामराज्याची जलद स्थापना होण्यास साहाय्य होणार आहे’, असे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी यातून लक्षात आणून दिले.

(२५.३.२०२०)

Leave a Comment