ट्विटरवर ‘Paratpar Guru’ हा ट्रेंड दिवसभर उच्चस्थानी !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २२ मे या दिवशी सकाळपासून #HinduEktaDindi या हॅशटॅगने आणि ‘Paratpar Guru’ अन् ‘परात्पर गुरु’ या ‘की-वर्ड्स’ने ट्विटरवर ट्रेंड करण्यात आला.

पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांच्या संदर्भात त्यांनी जे काही वर्तवले, ते अक्षरश: सत्यात उतरले. मला कार्य करण्यासाठी आणखी बळ मिळावे, असा त्यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करून प्रार्थना करतो !’