‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट

मुंबई येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर, तसेच स्मारकाचे कार्यवाहक श्री. राजेंद्र वराडकर आणि संशोधक श्री. धनंजय शिंदे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘आश्रम पाहून ‘हे खरेच ईश्वरी कार्य आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुनःपुन्हा यायला आवडेल.’- श्री. सतीश व्यंकटराय भट, काणकोण, गोवा.

‘निमाड अभ्युदय रूरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन (म.प्र.)’च्या संस्थापिका सुश्री भारती ठाकूर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

‘सनातनचा आश्रम पाहून सनातन हिंदु धर्माच्या उज्ज्वल भविष्याविषयी खात्री वाटली. आश्रम पुष्कळ सुंदर आहे आणि येथील व्यवस्थापन उत्तम आहे’, असे मत सुश्री भारती ठाकूर यांनी व्यक्त केले.

संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ श्री. अजित तेलंग यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ आणि ‘रेकी विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमल आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्यासह लघुपट दिग्दर्शक श्री. गिरिश केमकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, श्री. गिरिश केमकर, त्यांच्या सहकारी सौ. अमृता कामत आणि त्यांचे ५ विद्यार्थी हे १० ऑक्टोबरला गोवा येथे आले होते. सर्वांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे केवळ छायाचित्र पाहून त्यांच्या असामान्यत्वाविषयी तमिळनाडू येथील कांची कामाक्षी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. नटराज शास्त्री यांनी काढलेले उद्गार !

‘सूक्ष्मातून शरिराच्या बाहेर जाऊन परत आत येऊ शकतो’, असा एकही अवतारी जीव सध्या या पृथ्वीवर नाही. गुरुदेव डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) हेच असे एकमेव आहेत’, असे मला श्री कामाक्षीदेवी सांगत आहे.

सनातनचे ग्रंथ हे राष्ट्र आणि धर्म यांची चेतना जागृत करणारे ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान आणि सूक्ष्म चित्रे हे सनातनच्या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्य असून ते अध्यात्माची शिकवण देणारे आहेत. यांचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर यांनी केले.

अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ यांचे सनातनच्या कार्याला आशीर्वाद !

एकदा श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची एका अधिकारी संतांशी भेट झाली. त्यांची साधना एवढी आहे की, ‘अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ सतत या संतांच्या समवेत सूक्ष्मातून असतात’, असे त्यांनी सांगितले.

मालवण (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री. राजेश पारधी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे

मी सनातनच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण आश्रम बघून सनातनचे कार्य जाणून घेतले, तेव्हा ‘सनातनचे कार्य विशाल आणि अवर्णनीय आहे’, असे माझ्या लक्षात आले. याचे वर्णन करायला मी पामर आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’