रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. ‘मला आश्रमात अत्यंत प्रसन्नता जाणवली. साधकांच्या साधनेमुळे हे संपूर्ण स्थान सात्त्विक आणि ऊर्जायुक्त झाले आहे.’

– स्वामी आत्मस्वरूपानंद, पो. यादवपूर, कोलकाता. (१३.६.२०२२)

२. ‘भारतीय ऋषिपरंपरा पुन्हा प्रतिष्ठापित करण्याचा तुमचा हा महान प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे. देशभरात हिंदु धर्मजागृतीचे कार्य आणखी वाढवणे आवश्यक आहे.’

– स्वामी संयुक्तानंद, भारत सेवाश्रम संघ, कोलकाता. (१३.६.२०२२)

३. ‘सूक्ष्म जगताशी संबंधित प्रदर्शन पाहिल्यानंतर येथे (आध्यात्मिक) ज्ञान आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम झाल्याची प्रचीती आली.’

– श्री. राम ज्ञानीदास महात्यागी (संस्थापक, महात्यागी सेवा संस्थान, श्री तिरखेडी आश्रम), गोंदिया, महाराष्ट्र. (१५.६.२०२२)

४. ‘सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ‘आजच्या काळातही जप-तप करून नकारात्मक ऊर्जा (negative energy) नष्ट होते’, असे वाटते.’

– प.पू. चंद्रकांत महाराज शुक्ल (जिल्हा प्रमुख, गुरुवंदना मंच) बलसाड, गुजरात. (१६.६.२०२२)

५. ‘मला आश्रमात आनंद अनुभवता आला. आश्रमात येताच माझ्या पायांत होणार्‍या वेदना थांबल्या.’

– सुषमा सेठी, फरीदाबाद (१३.६.२०२२)

६. ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घातली पाहिजे. असे केल्यामुळे नवीन पिढीला दिशा मिळेल.’

– श्री. मदन मोहन उपाध्याय, संस्थापक, मिशन सनातन, आनंदनगर, रायपूर, छत्तीसगड. (१३.६.२०२२)

Leave a Comment