पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्यासह लघुपट दिग्दर्शक श्री. गिरिश केमकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

रामनाथी (गोवा) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, श्री. गिरिश केमकर, त्यांच्या सहकारी सौ. अमृता कामत आणि त्यांचे ५ विद्यार्थी हे १० ऑक्टोबरला आले होते. सर्वांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमालाही भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले. त्यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. मनोज सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि कु. रेणुका कुलकर्णी यांनी विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधन कार्याची माहिती दिली.

पू. पंडित केशव गिंडे

श्री. गिरिश केमकर यांचा परिचय

श्री. गिरिश केमकर हे मानसशास्त्रात बी.ए. असून, त्यांचे ‘एम्.ए. (कम्युनिकेशन सायन्स)’ (पुणे विद्यापीठ) असे शिक्षण झाले आहे. वृत्तपत्रांमध्ये काम करतांना त्यांना शोधपत्रकारितेचे पुरस्कार मिळाले. ‘ई-टीव्ही मराठी’ आणि १२ भाषांमधील वाहिन्या चालू करण्याचे मोठे कार्य श्री. केमकर यांनी ‘रामोजी फिल्म सिटी’मध्ये केले. त्यांनी अनेक लघुपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. सध्या ‘बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे’ येथे ‘फिल्ममेकिंग आणि ड्रामाटिक्स (filmmaking and dramatics) विभागा’चे प्रमुखपद त्यांच्याकडे आहे.

Leave a Comment