रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले.
‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले.
मु.पो. राख, तालुका पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके आणि त्यांची पत्नी सौ. संजना मांडके यांनी ५ एप्रिल या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात.
जामनगर (गुजरात) येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे माजी मुख्यध्यापक तथा पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. हितेश जानी यांनी ३१ मार्चला येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या महाराष्ट्रातील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.
‘सनातन धर्म शिकवण्यासाठी संस्थेद्वारे अत्याधुनिक पद्धतींचा उपयोग केला जात आहे’, हे पाहून पुष्कळ चांगले वाटले. माहितीजालाच्या (इंटरनेटच्या) काळात सनातन धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करता येऊ शकतो.
शीख पंथीय गुरु गोविंदसिंग यांच्या परंपरेतील आध्यात्मिक अधिकारी असलेले संत कर्नल के.एस्. मजेथिया यांनी १६ मार्च या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या समवेत त्यांचे अनुयायी श्री. कुलदीप सिंग आणि त्यांची पत्नी सौ. किरण सिंग आदीही होते.
सनातनच्या आश्रमात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्या पावन पादुकांचे शुभागमन झाले. म्हापसा, गोवा येथे होत असलेल्या सोमयागामध्ये सहभाग घेण्यासाठी श्री गजानन महाराज यांचे उत्तराधिकारी डॉ. राजीमवाले यांचे आणि श्रीपादुकांचे गोमंतकात आगमन झाले आहे.
‘आदित्य वाहिनी’चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्थेच्या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.
‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’ – अधिवक्ता चारुदत्त कळवणकर, भाजप नगरसेवक तथा नंदुरबार नगर परिषद विरोधी गटनेते, जयवंत चौक, नंदुरबार.
देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला मुलुंड (पू.) येथील भाजपचे माजी नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांनी, तसेच कला, क्रीडा आणि मुलाखत यांसाठी मुलांना मार्गदर्शन करणार्या ‘ईगल ब्रिगेड फाऊंडेशन’ या संस्थेचे संस्थापक अन् कोलशेत (ठाणे) येथील श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी भेट दिली
