‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने दाभोलकरांना (अंध)श्रद्धांजली वहावी ! – सनातन संस्थेचे अंनिसला आवाहन
‘विवेकाचा जागर’, ‘निर्भय वॉक’, ‘वैज्ञानिक दिन’ आदींच्या गोंडस नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) राज्यभरात दाभोलकरांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम करणार आहे. ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे.