रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

 

१.अ. ‘आश्रम पुष्कळच चांगला आहे. ‘आश्रम म्हणजे एक मंदिरच आहे’, असे मला वाटले. आश्रम म्हणजे रामाचा दरबार आहे. येथे श्रीरामाचेच राज्य आहे.

१.आ. ‘प्रत्येक व्यक्तीने हा आश्रम पहाण्याचे पुण्यकर्म करून जन्माचे सार्थक करावे’, असे मला वाटते.

१.इ. मी आश्रम पाहिल्यावर मला साक्षात् स्वर्ग पाहिल्यासारखे वाटले.

१.ई. मला एकाने सुचवल्यानुसार मी येथील कार्य समजून घेण्यासाठी आलो होतो. मी एक क्षुद्र जीव आहे; पण येथे आल्यामुळे ‘माझ्या जीवनाचे सार्थक झाले’, असे मला वाटले. मी येथे सेवा करण्यासाठी निश्चितच पुन्हा येईन.’

– श्री. विनायक भट, मडगाव, गोवा.(५.३.२०२२)

२.अ. ‘रामनाथी आश्रमात आल्यावर मला पुष्कळ शांत वाटले.

२.आ. येथील सर्व साधक अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे सेवा करतात.

२.इ. गुरुदेव आठवलेजी (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांची शिकवण पाहून मी भारावून गेलो.’

– श्री. सिद्धार्थ गुप्ता, कोलकाता (१७.३.२०२२)

 

Leave a Comment