द्वारका आणि ज्योतिष पिठांचे शंकाराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा देहत्याग !

द्वारका येथील शारदापीठ आणि बद्रीकाश्रम येथील ज्योतिष्पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज यांच्या देहत्यागाने हिंदु धर्मासाठी धगधगणारी ब्राह्मतेजाची ज्वाळा शांत झाली आहे…

‘निर्भय वॉक’ नव्हे, तर ‘पारदर्शक वॉक’ करत अंनिसने दाभोलकरांना (अंध)श्रद्धांजली वहावी ! – सनातन संस्थेचे अंनिसला आवाहन

‘विवेकाचा जागर’, ‘निर्भय वॉक’, ‘वैज्ञानिक दिन’ आदींच्या गोंडस नावाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) राज्यभरात दाभोलकरांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम करणार आहे. ज्या अंनिसच्या ट्रस्टचे हात आर्थिक घोटाळ्यांमध्ये बरबटले आहेत, ज्यांनी ट्रस्टच्या निधीत पारदर्शकता ठेवलेली नाही, त्यांनी ‘पुरोगामीत्वा’चा आव आणून ‘विवेका’चा जागर करायचा, ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे.

सनातनचे साधक आणि हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया’वरील ‘पोस्ट’ त्यांच्या वैयक्तिक समजाव्यात !

सनातन संस्था कोणत्याही राजकीय पक्षांसाठी कार्य करत नाही. सनातन संस्था कधीही राजकीय भूमिका मांडत नाही. संस्थेची अधिकृत भूमिका मांडण्याचा अधिकार केवळ सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांना आहे.

समीर गायकवाड अटकेप्रकरणी माहिती देणारे पोलीस अधिकारी संजय कुमार हे श्री तुळजाभवानी मंदिर घोटाळ्याप्रकरणी गप्प का राहिले ? – सनातन संस्था

….यातून त्यांनी समाजवाद्यांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला. तसा प्रयत्न श्री तुळजापूर देवस्थानातील घोटाळ्याविषयी केला असता, तर पाच वर्षांपूर्वीच महाराष्ट्रात मोठी जनजागृती होऊन दोषींवर कठोर कारवाई झाली असती, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे.

हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान – ‘जागर स्त्रीशक्तीचा !’

भारताला शूर, लढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकते. शौर्यजागरणासाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे,

समाजद्रोही आणि धर्मद्रोही निर्णय त्वरित मागे घ्या ! – सनातन संस्थेची मागणी

पंजाबमधील युवापिढी पूर्णपणे व्यसनाधीन झाली आहे, त्यावर ‘उडता पंजाब’सारखा सिनेमाही आला. हे वास्तव पहाता महाराष्ट्राने सजग होऊन खरेतर राज्य ‘दारूमुक्त’, ‘व्यसनमुक्त’ होण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत.

सनातनवरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने प्रेरित ! – सनातन संस्था

राज्याचे पर्यावरणमंत्री मा. आदित्यजी ठाकरे यांना मिळालेल्या धमक्यांचा सनातन संस्था तीव्र शब्दांत निषेध करते. या धमक्या देणार्‍या दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही करत आहोत;…

दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही – सनातन संस्था

नवाब मलिक यांनी स्वतःवर झालेल्या आरोपांच्या खुलाशासाठी सत्य जाणून न घेताच सनातन संस्थेच्या नावाचा विनाकारण वापर केला आहे. दाऊदची कोणतीही मालमत्ता सनातन संस्थेने खरेदी केलेली नाही.

मा.गो. वैद्यांच्या निधनामुळे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांची हानी !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतक माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनामुळे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या विचारांची हानी झाली आहे.