सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. या कार्याचा आवाका पुष्कळ वाढल्याने वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे सनातनच्या आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा आश्रमात श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या विविध दीपरचनांद्वारे श्री सिद्धिविनायकाची आराधना करण्यात आली. दिव्यांचा लखलखता प्रकाश लक्ष वेधून घेतो.

जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सनातन संस्थेच्या साधिकेचा प्रथम क्रमांक !

या वेळी सनातनच्या साधिका सौ. चैत्राली शुभम वडणगेकर म्हणाल्या, ‘‘निबंध स्पर्धेच्या पूर्वसिद्धतेसाठी मी सनातन संस्थेचा ‘आईचे दूध : भूलोकातील अमृत’ या ग्रंथाचा अभ्यास केला. या ग्रंथामधून अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.’’

निफाड (नाशिक) येथे आयोजित ‘हिंदूसंघटन मेळाव्या’मध्ये सनातनचे प्रवक्ता श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन !

…भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, संवैधानिक दृष्टीने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !

२१.७.२०२१ पासून महाड शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सावित्री, गांधारी अन् इतर नद्यांना महापूर येऊन पाणी महाड शहरामध्ये शिरले. त्यामुळे महाड शहरामध्ये जवळजवळ २० ते २५ फूट पाणी भरले आणि शहर दोन दिवस पाण्याखाली होते.

कोरोना महामारीच्या दळणवळण बंदी काळातील सनातन संस्थेच्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगाचा जिज्ञासूंना झालेला लाभ !

कोरोना महामारीमुळे दळणवळण बंदी चालू झाली. सनातन संस्थेच्या वतीने समाजाला अध्यात्मशास्त्राविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘ऑनलाईन’ साधना सत्संगांना आरंभ करण्यात आला. सत्संगांत अनेक जिज्ञासू नियमित सहभागी होऊ लागले. साधनेला आरंभ केल्यानंतर जिज्ञासूंचे मनोगत आणि त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्या शब्दांत येथे दिल्या आहेत.

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा देहत्याग

नम्रता, निरपेक्ष प्रीती यांसारखे अनेक दैवी गुण असलेले आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असलेले, तसेच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांनी ३० ऑक्टोबर २०२२ ला दुपारी ४.२७ वाजता दीर्घ आजारामुळे देहत्याग केला.

संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ श्री. अजित तेलंग यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ आणि ‘रेकी विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमल आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग यांनी १० ऑक्टोबर या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका

‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून वादळापासून बचाव करण्यासाठी देशातील १५ जिल्ह्यांतील २ लाख १९ सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले लक्ष्मी-कुबेर पूजन !

सर्व साधकांवर श्री महालक्ष्मी देवीची कृपा रहावी, अलक्ष्मीचा (निर्धनतेचा) परिहार व्हावा आणि धर्मकार्यासाठी समृद्धता यावी, यासाठी सप्तर्षी जीवनाडीच्या आज्ञेने २४.१०.२०२२ (दीपावली आणि लक्ष्मीपूजन) या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन केले.