सनातनच्या वतीने हावडा (बंगाल) येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित प्रवचनाला चांगला प्रतिसाद !

हावडा (बंगाल) – दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. तनुश्री साहा यांनी दत्तजयंतीचे महत्त्व, दत्त नावाची वैशिष्ट्ये, भगवान दत्तात्रयाच्या जन्माचे रहस्य, दत्त उपासनेचे शास्त्र आदी सूत्रांविषयी माहिती दिली. या वेळी श्री दत्ताचा सामूहिक नामजप करण्यात आला, तसेच उपस्थितांना ‘चैतन्यवाणी ॲप’ आणि ग्रंथ यांविषयी माहिती देण्यात आली. या प्रवचनाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. या वेळी उपस्थितांनी धर्मशिक्षण जाणून घेण्यासाठी नियमित सत्संगाची मागणी केली.

Leave a Comment