सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मान !

सद्गुरु श्री रितेश्‍वर महाराज यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना श्री. चेतन राजहंस

मुंबई – येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात १० डिसेंबर या दिवशी ‘हिंदु एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन’द्वारे आयोजित ‘पिलर्स ऑफ हिंदुत्व’ या संमेलनामध्ये विविध क्षेत्रांत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या प्रतिनिधींचा ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सद्गुरु श्री रितेश्‍वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी विविध क्षेत्रात कार्यरत संत, संपादक, अभिनेते, कलाकार, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख आणि राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी यांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ‘हिंदू एज्युकेशन अ‍ॅड रिसर्च फाऊंडेशन’च्या संस्थापिका आणि वरिष्ठ पत्रकार डॉ. वैदेही ताम्हण यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. या वेळी डॉ. वैदेही ताम्हण यांनी लिहिलेल्या सद्गुरु श्री रितेश्‍वर महाराज यांच्या ‘लाईफ बियाँड कॉम्प्लिकेशन्स’ या जीवनचरित्राचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘भारत पूर्वीपासून आध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे मनुष्यजीवनाचे सार्थक आहे, ही येथील संतांची शिकवण आहे. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी साक्षात् परमात्म्याचे दर्शन घडवले. त्याप्रमाणे देशातील संत हे समाज आणि देश यांना दिशा दाखवून भारताला पुन्हा एकदा विश्‍वगुरु करतील.’’

 

१. ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित मान्यवर !

१.अ. विविध क्षेत्रांतील संत

पुणे येथील दत्तभक्त सद्गुरु नारायण महाराज, पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, योगगुरु स्वामी कर्मवीर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भागवताचार्य स्वामी गिरीशनंद सरस्वती जी महाराज, मथुरा येथील महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन, हरिद्वार येथील महामंडलेश्‍वर डॉ. उमाकांतानंद सरस्वती, संत सोपानदेव समाधी संस्थान (सासवड) चे अध्यक्ष ह.भ.प. त्रिगुण महाराज गोसावी महाराज, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे शिवदास सरजी महाराज (पुणे)

१.आ. आविध क्षेत्रांतील मान्यवर

भक्तीसंगीतातील प्रसिद्ध गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल, शास्त्रीय संगीतामधील प्रसिद्ध गायिका सुमा घोष, ज्येष्ठ अभिनेते श्री. मुकेश खन्ना आणि श्री. शरद पोंक्षे, भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते स्वप्नील जोशी

१.इ.विविध क्षेत्रांतील हिंदुत्वनिष्ठ

ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगड विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते भाजपचे आमदार नारायण सिंह चंडेल, अयोध्या रामजन्मभूमीचा खटला लढणारे अधिवक्ता हरिशंकर जैन, विश्‍व हिंदु परिषदेच्या केंद्रीय समितीचे श्री. दादा वेदक, राष्ट्रीय व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके, ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी, सनातन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, हिंदू एकता समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, राष्ट्रकवी स्वामी ओम प्रकाश निडर आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रीती पांडे

२. राज्यघटनेमध्ये ‘धर्म’ आणि ‘सेक्युलर’ शब्दाची
परिभाषा द्यावी ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

राज्यघटनेत ‘धर्म’ हा शब्द नाही. या शब्दासाठी ‘रिलीजन’ हा शब्द वापरण्यात आला आहे. ‘धर्म’ आणि ‘पंथ’ हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द आहेत, असे ‘ऑक्सफोर्ड’ शब्दकोषांतूनही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यघटनेत सनातन धर्माला राजाश्रय दिलेला नसल्याने शंकराचार्य, धर्माचार्य, धर्मविषयक विविध व्यवस्था आदी कुणालाच राजाश्रय नाही. राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द वापरण्यात आला आहे. ‘सेक्युलर’ हा शब्द लौकिक अर्थाने ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दांसाठी वापरला जातो; परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ असे काही नसते. एक तर ‘धर्म’ असू शकतो किंवा अधर्म. त्यामुळे राज्यघटनेत ‘धर्म’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ या दोन्ही शब्दांचे अर्थ किंवा व्याख्या परिभाषित करण्यासाठी मागणी करणे आवश्यक आहे.

सद्गुरु श्री रितेश्‍वर महाराज यांच्याकडून पुरस्कार स्वीकारतांना डॉ. उदय धुरी

या वेळी डॉ. उदय धुरी यांनी हलाल प्रमाणपत्राचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा घातक परिणाम याविषयी माहिती दिली. डॉ. वैदेही ताम्हण यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 

३. ‘हिंदुत्व’ ही संपूर्ण विश्‍वाची जीवनधारा होईल ! – सद्गुरु श्री रितेश्‍वरजी महाराज

आपली सनातन हिंदु संस्कृती सामर्थ्यवान आणि समृद्ध असतांनाही तिचा स्वीकार करण्यात आपल्याला अडचण येते. हिंदु जाती-पातींमध्ये विभागले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदुत्वापासून वेगळे करण्याचे प्रयत्न चालू आहेत. ‘सनातन’ आणि ‘हिंदुत्व’ हे एकच आहे. ‘हिंदुत्व’ ही आपली, तसेच भारताची जीवनधारा आहे. ती संपूर्ण विश्‍वाचीही जीवनधारा होईल.

 

Leave a Comment