पेण येथील चामुंडा ज्वेलर्स आणि भारतीय ॲल्युमिनियम यांच्या मालकांची सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांविषयी जाणून घेतांना १. श्री. वरदी सिंह परमार आणि २.श्री. अमर सिंह परमार, समवेत त्यांचे कुटुंबीय

देवद (पनवेल) – पेण येथील ‘चामुंडा ज्वेलर्स’चे मालक श्री. वरदी सिंह परमार आणि ‘भारतीय ॲल्युमिनियम’चे मालक श्री. अमर सिंह परमार यांनी नुकतीच देवद (पनवेल) येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. ते दोघेही हिंदुत्वनिष्ठ असून राष्ट्र-धर्म कार्यात वेळोवेळी सहभागी होतात. आश्रमातील विविध सेवांविषयी त्यांना साधक श्री. पुष्कराज जोशी यांनी अवगत केले. ‘आश्रम पाहून चांगले वाटले. येथे सर्व सेवा नियोजनबद्धरित्या आणि समर्पित भावाने साधकांकडून केल्या जातात’, असे वरदी सिंह यांनी सांगितले, तर ‘उत्तम नियोजनकौशल्य, प्रेमाने वागणारे साधक, शिस्त, साधकांमधील देवत्व या सर्वच गोष्टी पुष्कळ आवडल्या’, असे अमर सिंह परमार यांनी सांगितले.

Leave a Comment