सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.
‘मातृभूमी राष्ट्रप्रेमी संस्था’ आयोजित वार्षिक अधिवेशनात अध्यात्मप्रसाराचे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांचा ‘मातृभूमी सन्मान’ देऊन सत्कार करण्यात आला.
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी नुकतीच येथील श्री काशीविश्वनाथ मंदिरात काशीविश्वेश्वराचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे आचार्य श्री. टेक नारायण उपाध्याय यांनी सद्गुरु जाधव यांचा, तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा भावपूर्ण सन्मान केला. या वेळी पुजारी उपाध्याय म्हणाले, ‘‘तुमच्यासारख्या सद्गुरु संतांमुळे ही भारतभूमी टिकून आहे.’’
येथे ४ ते ६ एप्रिल या कालावधीत आयोजित ‘आंतरराष्ट्रीय ज्योतिष, वास्तू आणि तंत्र संमेलना’त महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना धर्म अन् अध्यात्म क्षेत्रांतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी ‘धर्म अलंकार पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘गायत्री परिवारा’च्या वतीने उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी येथील सनातनच्या साधिका सौ. मंगला दरवे आणि सौ. दीपाली सिंगाभट्टी यांचा सत्कार करण्यात आला.
‘श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सव २०२० ते २०२६’ कार्यक्रमात सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रांतील योगदान अन् सेवाकार्य यांविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला.
‘इंडियन मेडिकल असोसिएशन फोंडा शाखा’ यांच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त ३ आधुनिक वैद्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सनातनचे साधक डॉ. पांडुरंग मराठे, तसेच डॉ. गजानन नाईक आणि डॉ. सूरज काणेकर यांचा समावेश होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीप्र्रीत्यर्थ यावर्षी पासून ‘श्वास फाऊंडेशन’च्या वतीने १५ जून या दिवशी ‘वीर सावरकर हिंदु गौरव पुरस्कार २०२५’ वितरित करण्यात आले.
केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार’ यावर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना घोषित करण्यात आला आहे.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांना ‘पुणे सार्वजनिक सभा’ यांच्याकडून ‘रमाबाई रानडे’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेणार्या कै. ग.वा. जोशी यांनी ‘पुणे सार्वजनिक सभा’ ही संस्था स्थापन केली आहे.
उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी सनातन संस्थेचा सन्मान भाजपशासित गुजरात राज्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्थेचे गुजरात येथील साधक श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांचा शाल आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान केला.