भोसरी (जिल्हा पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंच्या भेटी !

भोसरी (पुणे) – भोसरी (पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या द्वितीय दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या  ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंनी भेटी दिल्या. प्रदर्शनस्थळी विविध संस्थांची गोआधारित उत्पादने, पंचगव्य साबण, उदबत्ती, धूप, तसेच यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणी आयुर्वेदिक पडताळणी, तसेच पंचगव्य आधारित उपचार पद्धतीचा कक्ष चालू करण्यात आला असून नागरिकांसाठी पंचगव्य औषधेही उपलब्ध आहेत.

या सर्व परिषदेत डॉ. अनुजा कुलकर्णी, श्री. अजित कुलकर्णी, श्री. काशिनाथ थिटे-पाटील, अधिवक्ता अशोक मुंडे, श्री. ओंकार पुजारी, डॉ. दिलीप कुलकर्णी, दीपा कुलकर्णी, डॉ. प्रीती व्हिक्टर, राजीव देवकर, डॉ. रवींद्र दगडे, जयश्री जोशी, रोहिणी खिस्ती, डॉ. एन्.एम्. मार्कंडेय यांच्यासह विविध गोप्रेमी संघटनांचे पदाधिकारी नियमितचे कार्यक्रम, तसेच २४ आणि २५ डिसेंबरला होणार्‍या कार्यक्रमाची जय्यत सिद्धता करत आहेत.

 

कामधेनू यज्ञाच्या दुसर्‍या दिवशी विविध विधी !

कामधेनू यज्ञाच्या दुसर्‍या दिवशी विविध विधी करण्यात आले. यात देवस्मरण, स्वस्तिवाचन, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, मातृकास्थापिक देवतांचे पूजन, मंडपपूजन, स्तंभपूजन, षोडष स्तंभ पूजन, द्वारदेवता पूजन, चतुर्वेद पूजन, प्रधानदेवी सुरभी लाभोपचार पूजन, स्थापितदेवता हवन, प्रधानदेवता आहुती, तसेच सव्वा लाख आहुती पूर्ण करण्यासाठी चालू असलेले हवन आणि महाआरती करण्यात आली.

Leave a Comment