हिंदूंनो, हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

कोपरखैरणे (नवी मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

सौ. नयना भगत

 

कोपरखैरणे (नवी मुंबई) – निधर्मीवादाच्या विळख्यात अडकलेल्या बहुसंख्य हिंदूंना लव्ह जिहाद, हलाल जिहाद, भूमी जिहाद अशा निरनिराळ्या जिहादी प्रकरणांना प्रतिदिन बळी पडावे लागत आहे. हिंदूंना अल्पसंख्य करण्याचे षड्यंत्र रचले जात असून आता केवळ अल्पसंख्यांकांचे लाड पुरवणारे ‘काँग्रेसी पाप’ पुन्हा होऊ देऊ नका, तर अखंड सावधान राहून सर्वांनी एकत्रित येऊन हिंदु राष्ट्रासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची सिद्धता ठेवा, असे ज्वलंत उद्गार सनातन संस्थेच्या सौ. नयना भगत यांनी काढले. ११ डिसेंबर या दिवशी येथील चिकनेश्वर मंदिरात हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या वेळी त्या बोलत होत्या. या सभेला विश्व हिंदु परिषद, योग वेदांत सेवा समिती, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटनांच्या सदस्यांसह एकूण १०० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती होती.

सभेला उपस्थित धर्मप्रेमी

समितीचे कार्य श्री. वसंत सणस यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. ममता देसाई यांनी केले. चिकनेश्वर मंदिराचे विश्वस्त श्री. नीलेश पाटील यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. ‘पुष्पक डेकोरेटर्स’चे मोरेश्वर पाटील यांनी साहित्य उपलब्ध करून दिले. सायली शिंदे यांनीही साहाय्य केले. यासाठी सर्वांचे आभार मानण्यात आले.

क्षणचित्र

धर्मप्रेमींनी सभेनंतर स्वतःहूनच आवराआवरी करण्यासाठी साहाय्य केले.

आढावा बैठकीमधील धर्मप्रेमींचा प्रतिसाद !

१. ‘एखाद्या खोलीत १० ते १५ जणांना एकत्र येऊन रविवारी चर्च भरवतात किंवा काही धर्मांध १० ते १२ मुलांसह घराच्या आवारातच मदरसा चालवतात. अशा कायदाबाह्य गोष्टींना नागरिकांनीच प्रखर विरोध करायला हवा’, असे एका धर्माभिमान्याने सांगितले.

२. नवी मुंबईत सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मिळून मोठा मोर्चा काढायला हवा. ‘त्याद्वारे गोहत्या आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्यासाठी आपण शासनाला सांगू शकतो’, असेही मत अनेकांनी मांडले.

Leave a Comment