नवी मुंबई येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कामोठे (नवी मुंबई) येथे ‘६ वे मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’

कामोठे (नवी मुंबई) येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’ मध्ये सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देतांना पनवेल महानगरपालिका आयुक्त १. श्री. गणेश देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर

नवी मुंबई – कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे बांधकाम आणि विविध क्षेत्रांतील व्यावसायिक यांच्यासह विविध मान्यवर अन् जिज्ञासू यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळाविषयीची सिद्धता, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ घेतले, तसेच अनेकांनी या वेळी साधनेविषयी शंकानिरसन करून घेतले. ‘संपूर्ण ‘प्रॉपर्टी एक्सिबिशन’मध्ये सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात कार्य करणार्‍या सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन लोकांचे लक्ष वेधून घेत आहे’, अशी प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. येथील ‘बिल्डर असोसिएशनच्या समिती’चे या ग्रंथप्रदर्शनाला मोलाचे सहकार्य लाभले.

कामोठे (नवी मुंबई) येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्सिबिशन’ मध्ये सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू

अभिप्राय

१. नवी मुंबई येथील ‘पॅराडाईझ ग्रुप’चे मालक श्री. मधु भतीजा म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ मोठे असून आमच्याशी जोडलेल्या ‘रोटरी क्लब’, तसेच अन्य माध्यमांतून आम्ही अवश्य सहकार्य करू.’’

२. डी. डी. एस्.आर्. प्राइड ग्रुप’चे मालक श्री. राहुल हजारे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानत असून सनातन संस्थेच्या कार्याविषयी आम्हाला माहिती आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे भविष्यातील प्रकल्प आणि कार्य यालाही आम्ही अवश्य सहकार्य करू.’’

Leave a Comment