२५.१०.२०२२ या दिवशी दिसणारे खंडग्रास सूर्यग्रहण, ग्रहणाच्या कालावधीत पाळावयाचे नियम आणि ग्रहणाचे राशीपरत्वे मिळणारे फल !

‘आश्विन अमावास्या (२५.१०.२०२२, मंगळवार) या दिवशी भारतासह आशिया खंडाचा मध्य आणि पश्चिमेकडील प्रदेश, संपूर्ण युरोप खंड, आफ्रिका खंडाचा पूर्वाेत्तर प्रदेश या प्रदेशांत ग्रहण दिसेल.

त्रेतायुगापासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला ! – कु. कृतिका खत्री, प्रवक्त्या, सनातन संस्था

‘दीपावली’ हा शब्द ‘दीप’ आणि ‘आवली (ओळ)’ या शब्दांनी बनला आहे. त्याचा अर्थ दिव्यांची ओळ असा आहे. त्रेतायुगात १४ वर्षांचा वनवास संपवून प्रभु श्रीराम अयोध्येला परतले. त्या वेळी अयोध्यवासियांनी दीपोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून दीपावली हा सण चालू झाला आहे.

ईश्‍वराची भक्ती केली, तर तो संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करील, याची निश्‍चिती बाळगा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सावंतवाडी, देवगड, कुडाळ आणि कणकवली येथे ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी त्यांनी ‘ईश्‍वराची भक्ती केली, तर ईश्‍वर संकटकाळात आपले निश्‍चितच रक्षण करेल, याची निश्‍चिती बाळगा !’, असे प्रतिपादन करण्यासह उपस्थितांना साधनेसाठी दिशादर्शन केले.

अत्यंत साधी रहाणी असलेले, प्रेमळ आणि निःस्पृह पंत महाराज बाळेकुंद्री !

पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ आणि निःस्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने आणि सौजन्याने संसार आनंदमय बनवून आपले अवतार कार्य वयाच्या ५१ व्या वर्षी समाप्त केले.

कोपरगाव येथे हिंदूसंघटन मेळाव्यात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचे मार्गदर्शन !

भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला राज्यघटनेच्या दृष्टीने हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

बीड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यान

सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर श्री याज्ञवल्क्य वेद भवन या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्यासह लघुपट दिग्दर्शक श्री. गिरिश केमकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, श्री. गिरिश केमकर, त्यांच्या सहकारी सौ. अमृता कामत आणि त्यांचे ५ विद्यार्थी हे १० ऑक्टोबरला गोवा येथे आले होते. सर्वांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन तेथील कार्य जाणून घेतले.

युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनने क्रिमियातील कर्च पूल पाडल्याचा सूड उगवण्यासाठी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह तेथील १० शहरांवर आक्रमण केले, अशी माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली. रशियाने कीववर क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे सहस्रो नागरिकांना छावण्या आणि भूमीगत मेट्रोस्थानके येथे आश्रय घ्यावा लागला.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष प.पू. स्वामी सागरानंद महाराज यांचा देहत्याग !

नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी प.पू. महाराजांकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना वेळोवेळी मार्गदर्शन अन् त्यांचा आशीर्वादही लाभले. त्यांनी वेळोवेळी सनातन आणि समिती यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते यांच्यावर विशेष प्रीती होती.

स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हाच मानसिक आरोग्यासाठी रामबाण उपाय !

सनातन संस्था सांगत असलेली स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवूनच मनाच्या सैरभैरतेला आळा घालणे शक्य !