दुसर्या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !
उज्जैन – येथील दुसर्या वैश्विक अमृत स्नानाच्या निमित्ताने ९ मे या दिवशी ३० लाखांहून अधिक भाविकांनी आणि लाखो साधूसंतांनी क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले. या वेळी प्रचंड गर्दीचा ओघ असल्यामुळे पोलिसांना सर्वांना नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने यात्रा सुनियोजन करण्यात आले.