हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय

श्री. संतोष गरुड

    प्रतिवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी या दिवशी जागृती केली जाते. यासाठी जगभर विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि व्याख्याने आयोजित केली जातात. यामध्ये पर्यावरणाचा र्‍हास रोखण्याचा संदेश दिला जातो; पण असा दिवस साजरा करण्याने खरेच पर्यावरणाचे रक्षण होणार का ? याचा सूक्ष्म विचार पर्यावरणप्रेमींनी करावा. खर्‍या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हिंदु धर्माचे पुनरुज्जीवन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या लेखातून पर्यावरणप्रेमींच्या अंत:करणात हा प्रकाश निर्माण व्हावा, हीच निसर्गदेवाच्या चरणी प्रार्थना !

१. पाश्‍चात्त्यांना जाणीव होण्यापूर्वी
हिंदूंनी पर्यावरणाचा सर्वांगीण अभ्यास केलेला असणे

    पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून सिद्ध झाला आहे. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया आणि आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी, प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वांचे एकत्रित असणे म्हणजे परिसर. पर्यावरणात या सगळ्याच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता असते; कारण हे सगळे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. पर्यावरणातील घटक आणि त्यांचे परस्परसंबंध यांचा अभ्यास म्हणजेच परिसर अभ्यास, पर्यावरणाचा अभ्यास. असा अभ्यास करायचा असतो, याची जाणीव वर्ष १९६० या वर्षी पाश्‍चात्त्यांना झाली. याउलट हिंदू संस्कृतीत हा अभ्यास अतिशय प्राचीन काळीच झाला आहे. हिंदु धर्माइतका पर्यावरणाचा सखोल आणि व्यापक अभ्यास अन्य कोणत्याही धर्मात झालेला नाही, याचा अभिमान हिंदूंनी बाळगायला हवा.

२. पाश्‍चात्त्यांनी पर्यावरणप्रेमाचे
खूळ भरल्यावर त्यांची नक्कल करणारे भारतीय !

   पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघातांचे परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागले. जॉर्ज पर्किन आणि मर्श यांनी १९०७ या वर्षी प्रकाशित केलेल्या त्यांच्या मॅन अँड नेचर या पुस्तकात मानव आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर अन् त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पाश्‍चात्त्य जगतातील पहिले पुस्तक आहे. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी द आऊटलूक टॉक या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य पर्यावरण शिक्षण आणि सुधारणा असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा र्‍हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर भारतियांच्या डोक्यात पर्यावरण प्रेमाचे वारे डोक्यात वाहायला लागले. आपल्याकडील अव्वल दर्जाचे ज्ञान पाश्‍चात्त्यांनी मोहोर उमटवल्याशिवाय मान्य करायचे नाही, अशी भारतियांची मानसिकता आहे. त्यामुळे हिंदु धर्मात पर्यावरणाचा सर्वांगीण अभ्यास झाला आहे, असे कोणी सांगितले, तर त्याला वेडा, बुरसटलेल्या विचारसरणीचा ठरवले जाते. पर्यावरणातील सर्व प्राणिमात्रांच्या सुखाचा आणि कल्याणाचा विचार करणारी सर्वे भवन्तु सुखिनः, अशी प्रार्थना करणारी केवळ हिंदु संस्कृती आहे.

३. हिंदूंची सर्व शास्त्रे, कला,
उद्योग आदी पर्यावरणपूरकच असणे

   इ. स. १९६० मध्ये पाश्‍चिमात्य देशांमध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले. तेव्हापासून जगभर पर्यावरण आणि मानवी जीवन यांचे एकमेकांशी घट्ट नाते आहे, याची जाणीव पाश्‍चात्त्य जगताला पहिल्यांदा झाली. किंबहुना पर्यावरणाशिवाय मानवी जीवन सुखी होणे शक्य नाही, याची समज पाश्‍चात्त्यांना झाली. पाश्‍चात्त्यांना ही गोष्ट समजण्यापूर्वी कोट्यवधी वर्षांपूर्वी हिंदूंना संपूर्ण जीवसृष्टीच्या निर्मितीचे रहस्य आणि तिची शास्त्रशुद्ध रचना यांचे सर्वांगीण ज्ञान झाले होते. हिंदु संस्कृतीच्या प्रत्येक शाखांचा अभ्यास केल्यास हे सूत्र ठळकपणे स्पष्ट होते. हिंदूंची यज्ञसंस्था, कालगणना, उद्योगधंदे, स्थापत्यशास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीत कला इत्यादी सर्व पर्यावरणपूरक होत्या.

४. निसर्गपूजक हिंदु संस्कृतीचे
पुनरुज्जीवन हाच पर्यावरण रक्षणाचा उपाय !

    पर्यावरणासाठी गळा काढणारे हेच पाश्‍चात्त्य लोक पंधराव्या शतकात हिंदूंच्या संस्कृतीला रानटी, मागास, बुरसटलेली संस्कृती म्हणून हिणवत होते. आकाशातील बापाला सोडून निसर्गाची पूजा करतात; म्हणून या संस्कृतीचा द्वेष करत होते, हा इतिहास किमान हिंदूंनी तरी लक्षात घ्यायला हवा. या संस्कृतीचे विश्‍वात पुनरुज्जीवन झाल्यास पर्यावरण आपोआप संतुलित होईल, याची जाणीव आता काही पाश्‍चात्त्य देशांना झाली आहे. त्यामुळे ते भारताकडे मोठ्या आशेने पहात आहेत. आम्ही मात्र त्यांचे अंधानुकरण करण्यात धन्यता मानत आहोत.

५. पर्यावरणावर सत्ता गजवणारा हिंदु धर्म !

hindu_dharma

    यज्ञसंस्थेने पर्यावरण समृद्ध केले. निसर्गातील दैवी शक्तींची पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतले. यज्ञाद्वारे वायुमंडलशुद्धी होते. निसर्गाचा समतोल साधला गेल्यामुळे वेळेवर पाऊस पडतो आणि सर्वत्र सुबत्ता येते. आजच्या सर्व समस्यांना यज्ञ हे प्राचीन काळीच दिलेले चोख उत्तर आहे. प्राचीन काळात सोमयागाद्वारे पाऊस पाडण्याचे तंत्र भारतियांना अवगत झाले होते. भारतियांच्या शास्त्रीय संगीतामध्येदेखील निसर्गाचा समतोल राखण्याची क्षमता होती. संगीतातील मेघमल्हार रागामध्ये पाऊस पाडण्याची क्षमता होती. दीप रागातून अग्नी पेटवण्याची क्षमता होती. हा इतिहास आपण सर्वजण जाणता. एक पैसा खर्च न करता पाऊस पाडण्याची शक्ती हिंदु संस्कृतीमध्ये आहे; मात्र कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून निर्माण केलेली वैज्ञानिक उपकरणे पावसाचा एक थेंबदेखील पाडू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. वैद्यकशास्त्र अर्थात आयुर्वेद हे देखील पर्यावरणापूरक शास्त्र हिंदूंनी निर्माण केले आहे. अशा संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हिंदूंनी सिद्ध झाले पाहिजे.

६. नैसर्गिक आपत्तींपासून
वाचवण्यासाठी हिंदु धर्माविना पर्याय नाही !

     पाश्‍चात्त्य विद्वानांना ५६ वर्षांपूर्वी पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे शहाणपण सुचले. पर्यावरणाच्या प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे, हे त्यांच्या लक्षात आले; म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन आणि त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्याचा विचार चालू झाला. ही गोष्ट पाश्‍चात्त्य संस्कृतीचा उदय होण्याआधी पाचशे वर्षांपूर्वी इसवी सन पूर्व ५व्या शतकात आचार्य वराहमिहिर यांनी संशोधन करून ठेवली आहे. पर्यावरणीय आपत्ती कशामुळे येतात ? त्या येण्यापूर्वी वातावरणात कोणते पालट होतात ? या सर्वांची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी ग्रंथात नमूद केली आहे. हिंदु संस्कृतीने जगाला दिलेले हे एक मोठे वरदानच आहे.

७. एक दिवस पर्यावरण दिन साजरा करण्यापेक्षा
हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करा !

    वर्ष १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचे दायित्व मानवाचेच असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला आणि त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतीसत्रात ठरवण्यात आली. विज्ञानाचा अतिरेक करून पर्यावरणाची हानी करणार्‍या पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करून पर्यावरण दिन साजरे करून नव्हे, तर हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन केल्यास पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि वृद्धी सहज होऊ शकते, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे.

८. हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी
प्रथम हिंदु राष्ट्र स्थापन करणे अत्यंत आवश्यक !

    हिंदु संस्कृतीचे पुनरुज्जीवन होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा समावेश केल्यास नवी पिढी ज्ञानसंपन्न होईल. ही पिढी जगाला दिशा देऊ शकेल. अशा प्रकारे भारत संपूर्ण विश्‍वाचा गुरु होऊ शकेल; पण तशी पिढी निर्माण होणे धर्मनिरपेक्ष भारतात तरी शक्य नाही. शाळेत योग शिकवण्यासही विरोध होतो, तेथे हिंदूंचे धर्मग्रंथ शिकवणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. त्यासाठी हिंदूंनी धर्मनिरपेक्षतेच्या भोळसट विचारात न अडकता हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक बनले आहे. पर्यावरणवाद्यांच्या डोक्यातील अंध:कार नाहीसा होऊन हिंदु राष्ट्रस्थापनेचा प्रकाश निर्माण व्हावा, हीच निसर्गदेवाच्या चरणी प्रार्थना !

– निसर्गपूजक श्री. संतोष गरुड, पणजी, गोवा.

९. सनातन वेदधर्मात प्रदूषण निवारणार्थ सांगितलेला उपाय

९ अ. मानवी वृत्ती सत्त्वप्रधान होण्यातच प्रदूषणाचा अंत असणे

   हे सर्व जगत जगन्नियंत्या ईश्‍वराच्या संकल्पापासून निर्माण झाले आहे; म्हणून जसजसा मनुष्य सत्त्वगुणाकडे वाटचाल करत असतो, तसतसे त्याच्या संकल्पाला सत्यत्व येत जाऊन त्याचे प्रारब्ध ऐहिक सुखाच्या दृष्टीने त्याला अनुकूल होतेे. त्यामुळे मानवाची वृत्ती सत्त्वप्रधान होण्यातच प्रदूषणाचा अंत आहे, असे ओघानेच सिद्ध होते.

९ आ. प्रदूषण निवारण्यासाठी यज्ञाची आवश्यकता असणे

   प्रदूषण निवारणार्थ यज्ञाची आवश्यकता आहे. त्या यज्ञाचे निश्‍चित असे स्वरूप सनातन वेदधर्मच सांगू शकतो. यासाठी सर्व हिंदु धर्मियांनी त्याचे आचरण करून सर्व जगाला त्याची शिकवण द्यायला हवी, तरच या कार्याला यथार्थ आकार आला, असे म्हणता येईल.
– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (वर्ष १९९१)

१०. प्रदूषणाचे दुष्परिणाम आणि त्यांवरील उपाय

१० . मानवाच्या वैचारिक प्रदूषणाने प्राणवायू नष्ट होणे

  परदेशातील काही व्यक्ती संशोधनासाठी भारतात आल्या होत्या. पू. अरुणकाकांनी त्यांना सांगितले, वातावरणातील सध्याचे प्रदूषण सातत्याने वाढत आहे. सध्या ८५ टक्के प्राणवायू नष्ट होऊन १५ टक्के प्राणवायू शिल्लक राहिलेला आहे. मानवाच्या वैचारिक प्रदूषणाने प्राणवायू नष्ट झाला आहे. ही खरोखरच विश्‍वाच्या दृष्टीने घातक गोष्ट आहे.

१० . सभोवतालचे वातावरण संस्कारित करणे

   परदेशी संशोधकांनी यावर काय उपाय योजले पाहिजेत ?, असे पू. काकांना विचारले. प.पू. काकांनी सांगितले, सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून प्रत्येकाने जप-तप-अनुष्ठानाने आपल्या सभोवतालचे वातावरण संस्कारित केले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये ऋषीमुनींनी सातत्याने याग करून पृथ्वीवरील वातावरण संस्कारित ठेवले. सात्त्विक असे तीळ, तूप आणि समिधा यांचे अग्निनारायणाला हवन देऊन वातावरण शुद्ध केले.

१० . गैरसमजांमुळे याग संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत जाणे

   सध्या वैचारिक प्रदूषण पसरले असल्यामुळे तीळ, तूप आणि समिधा यांचे हवन करणे, म्हणजे धूर निर्माण करणे, असे समजले जाते. या गोष्टींचा वापर केवळ मनुष्याच्या नित्य जीवनासाठी करावा. यज्ञयागांमधून त्या अग्निनारायणाला या गोष्टी अर्पण करणे, म्हणजे केवळ त्याचा अपव्यय करणे, असे समजले जाते, त्यामुळे दिवसेंदिवस याग संस्कृती लोप पावत आहे. तिला पुनर्जीवन देण्यासाठी अग्निहोत्र विद्यापिठाची स्थापना करायला हवी.

१० . यज्ञामुळे मोठ्या प्रमाणावर प्राणवायूची
निर्मिती होत असल्याने त्याच्या आयोजनाची आवश्यकता

   पू. काकांनी नुकतेच असे वक्तव्य केले की, वातावरणामध्ये केवळ ५ टक्के प्राणवायू शेष राहिला असून प्रदूषणाचे प्रमाण ९५ टक्क्यांंच्या वर गेले आहे. सर्वत्र यागांचे आयोजन व्हायला हवे, अन्यथा भविष्यकाळामध्ये प्राणवायूची टाकी (सिलेंडर) पाठीला लावून हिंडावे लागेल. ज्या वेळी यज्ञाचे तापमान ४०० डिग्री सेल्सियसच्या पुढे जाते, त्या वेळी त्यावर गुलाबाच्या पाकळ्या प्रोक्षण केल्या, तर तेथील वातावरणातील विषमज्वराचे जिवाणू तात्काळ नष्ट होतात आणि मोठ्या प्रमाणावर प्राणवायूची निर्मिती होते. हे विज्ञानानेच सिद्ध झालेले आहे.
(सत्संग-धारा, दिवाळी विशेषांक २०१०)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात