घरातील प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी १५ – २० फुलपाखरे घरात येऊ लागणे

घरात येत असलेली फुलपाखरे
काही कारणाने मरू लागल्याने त्याचे वाईट वाटून
ती घरी न येण्यासाठी प्रार्थना करणे; पण त्यामुळे एका
आध्यात्मिक घटनेला मुकल्याची चूक केल्याचे संतांनी सांगणे

 

१. घरातील प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे,
अशी १५ – २० फुलपाखरे घरात येऊ लागणे

फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची. स्नानगृह, स्वयंपाकघर अशा सर्व ठिकाणी त्यांचा वावर असायचा. कपडे घालायला कपड्यांची घडी उघडली की, त्यातून फुलपाखरू बाहेर पडायचे. फुलपाखरांचे हे दृश्य पुष्कळ आनंददायी असायचे.

 

२. घरात पंख्याला धडकून आणि
पायाखाली येऊन फुलपाखरे मरू लागणे,
फुलपाखरे घरात येऊन मरतात, हे मनाला
बरे न वाटल्यामुळे घरात गोमूत्र शिंपडून प्रार्थना
करणे आणि त्यानंतर फुलपाखरे घरात यायचीच बंद होणे

nidhi_deshmukh_2012_col
कु. निधी देशमुख

नंतर नंतर मात्र ती फुलपाखरे पंख्याला धडकून मरायची किंवा त्यांना उडता येत नसल्याने ती भूमीवर चालत असतांना पायाखाली यायची. प्रतिदिन मेलेली फुलपाखरे उचलून केरात टाकावी लागायची. त्यामुळे आपल्याला जरी त्यांच्या येण्याने आनंद होत असला, तरी ती घरात येऊन मरतात, हे बरे नाही, असे आम्हाला वाटू लागले. याच काळात माझा भाऊ निषादही घरी आला होता. त्यालासुद्धा फुलपाखरे घरी येऊन मरतात, हे चांगले वाटले नाही. त्यामुळे आम्ही घरात गोमूत्र शिंपडून देवाला प्रार्थना केली आणि त्यानंतर फुलपाखरे घरात यायचीच बंद झाली.

 

३. फुलपाखरे घरात न येण्यासाठी प्रार्थना करायला नको
होती, असे एका संतांनी सांगितल्यावर चूक लक्षात येणे

एका संतांना याविषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले, फुलपाखरे घरात येणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या चांगले लक्षण होते. ती तेथे मरणे, हे देवाचे नियोजन होते. त्यामुळे फुलपाखरे घरात न येण्यासाठी प्रार्थना करायला नको होती. कोणाला न विचारता मनाने केल्यामुळे आमच्याकडून ही चूक झाली. त्यासाठी देवाची आणि त्या जिवांची क्षमा मागते. फुलपाखरे पुन्हा घरात येऊ लागल्यावर त्यांचे चित्रीकरण करावे, असेही त्या संतांनी सांगितले. देवाने चूक झाल्यावरही पुन्हा संधी दिली, यासाठी आम्ही देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

– कु. निधी देशमुख, भोपाळ, मध्यप्रदेश. (१९.४.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात