श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या आणि सात्त्विक सौंदर्याचा आविष्कार असलेल्या सनातनच्या आश्रमात करण्यात आलेल्या मनोहारी दीपरचना !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्री ऋद्धि-सिद्धिसहित सिद्धिविनायकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हा आश्रमात श्री गणेशतत्त्व आकृष्ट करणार्‍या विविध दीपरचनांद्वारे श्री सिद्धिविनायकाची आराधना करण्यात आली. दिव्यांचा लखलखता प्रकाश लक्ष वेधून घेतो.

वाराणसी आश्रमातील बुद्धीअगम्य पालट

वाराणसी आश्रमात राहून तेथील आश्रमजीवन अनुभवणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना आश्रमाविषयी वाटणारा कृतज्ञताभाव आणि आश्रमातील चैतन्य वृद्धींगत होत असल्याचे दर्शवणारे बुद्धीअगम्य पालट यांविषयी येथे पाहूया.

राजकोट (गुजरात) येथील ‘पुनरुत्थान विद्यापिठा’चे माजी संयोजक पराग बाबरिया यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले. भारतीय शिक्षण पद्धतीनुसार येथे साधकांना घडवले जात आहे. हिंदु संस्कृतीविषयी चांगल्या प्रकारे समजावले जाते, हे पाहून चांगले वाटले’, असे श्री. बाबरिया म्हणाले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीराम शाळिग्रामाची चैतन्यमय वातावरणात प्रतिष्ठापना !

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार सनातनच्या आश्रमात नुकतीच श्रीराम शाळिग्रामाची प्रतिष्ठापना चैतन्यमय वातावरणात करण्यात आली. सप्तर्षींच्या आज्ञेने प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम शाळिग्रामावर गुलाबजल आणि दूध यांचा अभिषेक करण्यात आला.

वाराणसी येथील सेवाकेंद्राच्या प्रांगणात उगवलेले वैशिष्ट्यपूर्ण पेरूचे झाड !

या पेरूच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला अनेक ठिकाणी एकाच जागी ४ ते ५ पेरू लागतात आणि एकाच फांदीला अनेक पेरू एका ओळीत लागतात.

सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात पिवळ्या रंगाच्या चिमणीने येऊन प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर बसण्यामागील अध्यात्मशास्त्र !

एक पिवळ्या रंगाची चिमणी सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आली होती. ध्यानमंदिरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांच्या खोक्यावर ही चिमणी बसली होती. ‘चिमणी प.पू. भक्तराज महाराज यांच्या पादुकांतून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याकडे आकृष्ट झाल्याने हे चैतन्य ग्रहण करण्यासाठी ध्यानमंदिरात आली आहे’, असे जाणवले.

‘कोरोना महामारी’च्या काळामध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवण्यामागील कारणमीमांसा

औदुंबराची झाडे हवेमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात प्राणवायू सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही औदुंबर हा पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचा वृक्ष आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमातील ध्यानमंदिरात अनेक देवता असण्यामागील विश्‍लेषण

येथील प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींचा आध्यात्मिक स्तरावर विचार करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा आश्रम आदर्श बनवला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिर होय.

ऋषिमुनींच्या आश्रमात वावरणार्‍या पशू-पक्ष्यांची आठवण करून देणारे सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्याकडे आकृष्ट होणारे पक्षी !

पक्ष्यांनी सात्त्विक वातावरण, साधक आणि संत यांच्याकडे आकृष्ट होण्यामागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारणमीमांसा याचे नाविन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन ! पूर्वी ऋषिमुनींच्या आश्रमात जे दृश्य पहायला मिळायचे, तसेच दृश्य कलियुगातील सनातनचे आश्रम, संत आणि साधक यांच्या संदर्भात पहायला मिळत आहे. अशीच काही उदाहरणे आपण येथे पहाणार आहोत.

जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !

पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.