परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासिकेच्या आगाशीतून रस्त्यावरील दिवा पुष्कळ तेजस्वी आणि भोवती मोठे वलय असलेला दिसणे, या वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक घटनेमागील कारण जाणण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना रात्रीच्या वेळी आश्रमाच्या परिसराला लागूनच असलेल्या रस्त्यावरील एका दिव्याभोवती पुष्कळ मोठे वलय असल्याचे आणि त्याचा तेजस्वीपणा वाढल्याचे लक्षात आलेे. ‘हे पालट का आणि कसे होतात ?’, हे जाणण्यासाठी डोळ्यांना दिसलेली ही वैशिष्ट्यपूर्ण घटना छायाचित्रकात (कॅमेर्यात) टिपण्याचा या चाचणीचा उद्देश होता.