करावे गाव, सीवूड्स – प्रत्येक जण जन्मतः हिंदूच असतो. नंतर इतर संस्कार करून बळजोरीने अन्य धर्मीय त्याच्यावर धर्म लादतात. हिंदु धर्म विश्व धर्म व्हायला काहीच अवघड नाही. केवळ हिंदूंना जाणीव करून देणे आवश्यक आहे, असे उद्गार ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी काढले. करावे गावातील हरिनाम सप्ताहात ते बोलत होते.
समितीचे डॉ. उदय धुरी यांनी राम मंदिर, गोहत्या बंदी कायदा, लव्ह जिहाद, मंदिर सरकारीकरण कायदा, हिंदू धर्मियांची सद्यस्थिती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या वेळी ह.भ.प. हरिदास माळी, ह.भ.प. चंद्रकांत महामुनी, श्री. शिवाजी सुतार, श्री. वसंत वांगदरे, श्री. पांडुरंग गव्हाणे, श्री. अभिमन्यू ठाकरे, श्री. ज्ञानेश्वर तपिसे, श्री. नामदेव वासकर, श्री. नारायण काशीद, श्री. रमेश सातपुते, श्री. अनंत सातपुते, तसेच इंद्रायणी प्रासादिक भजन मंडळाच्या महिला प्रवचनकार आणि करावे गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती.
संस्कृतीरक्षण करणार असल्याचे धर्मप्रेमींनी अभिमानाने सांगितले !
व्याख्यानानंतर उपस्थित धर्मप्रेमींनी अभिमानाने सांगितले की, आम्ही गुढीपाडवा हेच नववर्ष मानून साजरे करतो. आम्ही पूर्वीपासूनच केक कापणे बंद केले आहे. या वेळी एका धर्मप्रेमीने ‘लव्ह जिहादसारख्या आघातांचा मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रचार करीन’, असे आवर्जून सांगितले.
परम पूज्य डॉ. आठवले यांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे !
‘परम पूज्य डॉ. आठवले यांनी कलियुगामध्ये गीतेत सांगितल्याप्रमाणे अवतार घेतला आहे. सनातन धर्माचे कार्य काळानुरूप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच विश्वात हिंदु धर्माची स्थापना होईल’, असेही ह.भ.प. नामदेव महाराज वासकर यांनी म्हटले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ सनातन संस्थाच करू शकते ! – श्री. अनिल धीर
पुढील १०० वर्षे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन मिळावे, ही प्रार्थना ! –...
सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला...
सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कु. मुग्धा वैशंपायन यांची रामनाथी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !
सनातन संस्थेच्या प्रदर्शनाच्या ठिकाणी आल्यानंतर परत निघायची इच्छा होत नाही ! – जगजीतन पांडे, महामंत्री,...
भारत शासनाचे माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट