स्वामी विवेकानंद

प्रस्तुत लेखात आपण स्वामी विवेकानंदांनी केलीली गुरुसेवा, गुरुंप्रती असलेला त्यांचा भाव, गुरुकृपेचे महत्त्व अन् स्वामींना गुरुकृपेमुळे समष्टीसमवेत व्यष्टी ध्येयपूर्ती कशी झाली याचे विवेचन करण्यात आले आहे.

थिऑसॉफिस्टांच्या हिंदुविरोधी प्रवृत्तीविषयी पोटतिडकीने बोलणारे स्वामी विवेकानंद !

इंग्लंडमधील आणि अमेरिकेतील माझ्या अल्पशा कार्यास ‘थिऑसॉफिस्ट’ लोकांनी साहाय्य केले, असे वृत्त सगळीकडे पसरवण्यात येत आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की, ही बातमी सर्वस्वी असत्य आहे, पूर्णपणे चुकीची आहे – स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांच्यासारखा जाज्ज्वल्य धर्माभिमान स्वत:मध्ये बाणवा !

स्वामीजी त्यांच्या शिष्यांसह काश्मीरला गेले होते. तेथे क्षीर भवानीच्या मंदिराचे भग्न अवशेष त्यांनी पाहिले. अत्यंत विषण्ण होऊन स्वामीजींनी स्वत:च्या मनाला विचारले, जेव्हा हे मंदिर भ्रष्ट आणि भग्न केले जात होते, तेव्हा लोकांनी प्राणपणाने प्रतिकार कसा केला नाही ?

भावशक्तीच्या जोरावर विदेशात धर्मजागृतीचे महान कार्य प्रभावीपणे आणि यशस्वीरित्या पार पाडू शकणारे स्वामी विवेकानंद !

स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी, म्हणजेच सनातन हिंदु धर्माचे तेज विदेशात पसरवण्यासाठी सवर्र् धर्म परिषदेच्या निमित्ताने भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागो (अमेरिका) येथे गेले होते.

ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु धर्माचे प्रसारक बनलेले तेजस्वी आणि ध्येयवादी व्यक्तीमत्त्व स्वामी विवेकानंद

इंग्रजांचे वर्चस्व असतांना भारतभूमी अन् हिंदु धर्म यांच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वहाणारी आणि तन, मन, धन आणि प्राण याच उद्धारकार्यासाठी अर्पण करणारी काही नवरत्ने भारतात होऊन गेली. त्यांपैकी एक दैदिप्यमान रत्न म्हणजे स्वामी विवेकानंद. धर्मप्रवर्तक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि वेदान्तमार्गी राष्ट्रसंत इत्यादी विविध नात्यांनी विवेकानंदांचे नाव सर्व जगात प्रसिद्ध आहे. ऐन तारुण्यात संन्यासाश्रमाची दीक्षा घेऊन हिंदु … Read more

धर्मांतर शुद्धीकरणाविषयी स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केलेले विचार !

धर्मांतर झालेले हिंदू आणि मूलतः अहिंदु असलेले यांचे शुद्धीकरण या विषयावर प्रबुद्ध भारत या नियतकालिकाने वर्ष १८९९ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी प्रबुद्ध भारतच्या प्रतिनिधीने विचारलेल्या शंकांचे स्वामी विवेकानंदांनी केलेले निरसन पुढे साररूपात दिले आहे.

स्वामी विवेकानंद यांचे समाजाला उद्धृत करणारे बोल !

भयंकर दोष निर्माण करणार्‍या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार पाहूया.