उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची देहलीच्या विश्‍व पुस्तक मेळाव्यातील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास भेट

डावीकडून श्री. प्रशांत वैती, ग्रंथ भेट देतांना कु. कृतिका खत्री, श्री. बलदेव शर्मा आणि श्री. राम नाईक (सर्वांत उजवीकडे)

नवी देहली – येथील प्रगती मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विश्‍व पुस्तक मेळाव्यात उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्री. राम नाईक यांनी ९ जानेवारी या दिवशी भेट दिली. या वेळी ते सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाजवळ आले असता कु. कृतिका खत्री यांनी त्यांना सनातन संस्थेविषयी अवगत केले, तेव्हा त्यांनी ‘मला सनातनविषयी माहिती आहे’, असे सांगितले. याप्रसंगी सनातन संस्थेकडून श्री. राम नाईक यांना ‘हिन्दू राष्ट्र स्थापना की दिशा’, हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष श्री. बलदेव शर्मा हेही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment