महाकुंभ येथे सनातन संस्थेच्या प्रदर्शनाला जिज्ञासू, हिंदुत्ववादी, मान्यवर आणि संत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथील सेक्टर ९, गंगेश्वर कैलाशपुरी चौक, कैलाशद्वार येथे लावण्यात आलेल्या ‘सनातन संस्कृती आणि ग्रंथ प्रदर्शना’ला भेट दिली.

विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुटीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

साधक-पालकांनो, आपले पाल्य म्हणजे हिंदु राष्ट्राची भावी पिढी ! या पिढीवर सुसंस्कार करणे आणि त्यांच्या मनावर साधनेचे बीज रुजवणे आवश्यक आहे…

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते….

सनातन संस्‍थेच्‍या साधिका सौ. कल्‍पना देशपांडे या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्‍काराने सन्‍मानित !

येथील सनातन संस्‍थेच्‍या साधिका आणि शिक्षिका सौ. कल्‍पना देशपांडे यांची ‘सरस्‍वती भुवन शिक्षण संस्‍थे’च्‍या वतीने शैक्षणिक कार्याबद्दल दिल्‍या जाणार्‍या ‘कै. शालिनी राव पारगावकर’ पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली. सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने आणि त्‍यांनी करून घेतलेल्‍या प्रयत्नांमुळे हा पुरस्‍कार मिळाल्‍याविषयी सौ. कल्‍पना देशपांडे यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.

आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….

सनातन संस्थेच्या वतीने वाणेवाडी (पुणे) येथे जाहीर साधना प्रवचन पार पडले !

या वेळी आधुनिक वैद्या ज्योती काळे म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती आनंद मिळवण्यासाठी धडपड करत असते. हा आनंद मिळवण्यासाठी कलियुगात नामसाधना हा सोपा मार्ग आहे. नामामुळे प्रारब्ध नष्ट होते.

देहली, फरीदाबाद, नोएडा, मथुरा येथे महाशिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने देहली, फरीदाबाद आणि नोएडा येथील ९ मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

बांदिवडे, फोंडा येथील सौ. ज्योती ढवळीकर (वय ६३ वर्षे) सनातनच्या १३२ व्या (समष्टी) संतपदी विराजमान

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडलेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात ही घोषणा करण्यात आली. या वेळी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या कुटुंबातील काही सदस्य आणि साधक उपस्थित होते. या वेळी सर्वांची भावजागृती झाली.