सात्त्विक आचरण करण्याविषयीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या शिकवणीनुसार सनातन संस्था कार्य करत आहे ! – विकास कुलकर्णी
देवद (पनवेल), १३ जुलै (वार्ता.) – सनातन संस्था आणि आश्रम यांचे अभूतपूर्व कार्य पाहून आणि आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान मिळाल्याने मी भरून पावलो. निष्काम कर्म कसे करावे, याविषयी आश्रमातील साधकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे मला आत्मिक समाधान मिळाले. आश्रमातील सेवा सात्त्विक पद्धतीने केल्या जातात, ते पाहून मी प्रभावित झालो. सनातन संस्था राबवत असलेल्या स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेची आज सर्वांनाच आवश्यकता आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांनी ज्या पद्धतीने समाजाला संस्कृती आणि सात्त्विक आचरण करायला शिकवले, त्याच पद्धतीने सनातन संस्था कार्य करत आहे, असा अभिप्राय राजभवनाचे अवर सचिव श्री. विकास कुलकर्णी यांनी दिला. १२ जुलै या दिवशी त्यांनी देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. वृषाली कुलकर्णी, शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक आणि शास्त्रज्ञ डॉ. शशिकांत मेश्राम हेही उपस्थित होते. आश्रमातील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. निनाद गाडगीळ यांनी त्यांना आश्रमात चालणार्या सेवांविषयी अवगत केले. ‘संस्थेच्या धार्मिक कार्याला माझ्या शुभेच्छा ! संस्थेच्या कोणत्याही कार्याला सहकार्य करण्यास मला मनापासून आवडेल ! जय गुरुदेव’, असेही ते या वेळी म्हणाले.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आश्रमभेटीचा योग आला. आश्रमातील सात्त्विक वातावरण अंतरात्म्याला आध्यात्मिक आनंदाची अनुभूती प्रदान करणारे असून अशा उपक्रमांची आणि आध्यात्मिक संस्कारांचा विद्यापिठातील अभ्यासक्रमात समावेश असण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली.
– शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, पनवेल
सनातनचे कार्य पुष्कळ चांगले आहे. साधनेविषयी प्रचार-प्रसार चांगल्या प्रकारे केला जात आहे. अशा प्रकारे मनाला आनंद देणारे काम करणे आज आवश्यक आहे. सनातन संस्थेच्या पद्धतीप्रमाणे प्रशिक्षण प्रत्येक कार्यालय आणि महाविद्यालय येथे द्यायला हवे.
– शास्त्रज्ञ डॉ. शशिकांत मेश्राम, पनवेल

कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट...
नागपूर-वणी येथील सुप्रसिद्ध शिल्पकार तथा मूर्तीकार अशोक सोनकुसरे यांनी दिली सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
सनातनचा आश्रम देशभरातील हिंदूंना योग्य दिशा देण्याचे काम करतो ! – खासदार डॉ. अनिल बोंडे
अधिवक्ता आलोक कुमार यांची सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमाला भेट !
राजस्थानचे प्रसिद्ध उद्योजक आणि ‘लघुउद्योग भारती’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ताराचंद गोयल यांची गोव्यातील सनातन आश्रमाला सदिच्छा...
प्रसिद्ध लेखक शंतनू गुप्ता यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सहकुटुंब सदिच्छा भेट !