
बेळगाव – बेळगाव जिल्ह्यात बेळगाव शहर, खानापूर, येळ्ळूर, रामनगर या ४ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. या तिन्ही महोत्सवांसाठी १ सहस्र ६०० जणांची उपस्थिती होती. बेळगाव शहरात झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी ५५० जिज्ञासूंची उपस्थिती होती. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या पू. (श्रीमती) विजया दीक्षितआजी यांची वंदनीय उपस्थिती होती. बेळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. धनंजय जाधव यांनी ‘हिंदूंनी त्यांच्यावर असणारी संकटे परतवून लावण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे’, असे मत मांडले. येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. आदित्य शास्त्री यांनी उपस्थितांना संबोधित केले. येथील महोत्सवासाठी विविध गावांतून गाड्या करून अनेक जिज्ञासू उपस्थित होते.
खानापूर येथील गुरुपौर्णिमेसाठी ४२५ जणांची, येळ्ळूर येथे ३२० जण, तर रामनगर येथे ३२५ जणांची उपस्थिती होती. रामनगर येथील गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सनातन संस्थेचे पू. शंकर गुंजेकर यांची वंदनीय उपस्थिती होती. येळ्ळूर येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. मारुति सुतार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.



सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !
शदाणी दरबारच्या नारीशक्ती संमेलनात सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ...
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !