
छत्रपती संभाजीनगर, १३ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील समर्थनगर, सातारा परिसर, हर्सूल आणि रांजणगाव येथे एकूण ४ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यांचा लाभ ४०० हून अधिक साधक आणि जिज्ञासू यांनी घेतला.
रांजणगाव
सर्व हिंदूंनी संघटित होऊन हनुमानाची उपासना करणे ही काळाची आवश्यकता ! – सुभाष मोकारिया, प्रांत अध्यक्ष, बजरंग दल

सर्व हिंदूंनी हनुमानाच्या मंदिरात संघटित होऊन देवाला आळवणे, भक्ती करणे आणि हनुमानचालिसा पठण करणे, एकत्रित येऊन उपासना करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन श्री. सुभाष मोकारिया यांनी केले.
सौ. श्वेता देशपांडे, सनातन संस्था यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवसेनेचे स्थानिक अध्यक्ष श्री. लक्ष्मण वैष्णव आणि श्री. सोनवणे बाबा यांची या वेळी वंदनीय उपस्थिती होती.
हर्सूल
कुठलेही राष्ट्र धर्माच्या अधिष्ठानाविना उभे राहू शकत नाही ! – ह.भ.प. अरुण पिंपळे महाराज, संस्थापक, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान
धर्म आणि राष्ट्र ही एकाच गाडीची दोन चाके आहेत. कुठलेही राष्ट्र धर्माच्या अधिष्ठानाविना उभे राहू शकत नाही. धर्म हा राष्ट्राचा आत्मा असतो. वारकरी आंदोलनात ‘सनातन प्रभात’ या दैनिकाने नेहमीच प्रखर बाजू मांडून पू. निवृत्ती बाबांच्या कार्याला लोकांपर्यंत पोचवण्यास सहकार्य केले.
श्री. प्रणव चरखा, सनातन संस्था यांचेही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन लाभले.
समर्थनगर
हिंदूंना आपल्या संस्कृतीचा विसर पडल्यामुळे पुरो(अधो)गामी अंधश्रद्धावाल्यांचे फावते ! – पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

हिंदूंना स्वत:च्या महान संस्कृतीचा, देशाच्या इतिहासाचा अभ्यासाचा विसर पडल्यामुळे पुरो(अधो)गामी अंधश्रद्धावाल्यांचे फावते. आपल्या मौल्यवान संस्कृतीचे महाकुंभ, पंढरीची वारी, गणेशोत्सव यांच्यावर पुरोगामी अंधश्रद्धा म्हणून टीका करतात. आज समाज आणि देश दोन्हीही पोखरले जात आहेत, शहरी नक्षलवादी आपल्या आसपास वावरत आहेत. पहलगाम आक्रमण देश विचारून नाही, तर धर्म विचारून झाले. आपण आपला धर्म आणि राष्ट्र यांचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे.
श्रीमती राजेश्री जोशी, सनातन संस्था यांचेही या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन लाभले.
ऑरेंज सिटी, सातारा परिसर
धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हीच खरी गुरुदक्षिणा ! – कु. श्रुती शिरसाठ, हिंदु जनजागृती समिती

प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणार्यांची संख्या अन् शस्त्रबळ अधिक होते; पण अंतिम विजय हा धर्माचाच झाला आहे. भगवंत आणि गुरुतत्त्व यांचे आशीर्वाद धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्यांवरच असतो. धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हीच खरी गुरुदक्षिणा ठरणार आहे.
सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेली विविध प्रवचने आणि ग्रंथप्रदर्शने यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद !
मुंबईत होणार्या श्री राजमातंगी महायज्ञाचा ठिकठिकाणी बैठकांद्वारे प्रसार !
सनातन आश्रम, रामनाथी येथे भावपूर्ण वातावरणात श्री चंडी होम पार पडला
राजहंसगड (बेळगाव) मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ‘श्रीराम नामदिंडी’ पार पडली !
श्रीरामनवमीच्या निमित्ताने ठिकठिकाणी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाचे आयोजन करा !
महाशिवरात्रीनिमित्त मुंबई आणि नवी मुंबई येथे सनातन संस्थेच्या वतीने ५२ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाद्वारे अध्यात्मप्रसार !