आज सरकारने सनातन संस्थेला समवेत घेऊन महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत संस्कृती-संवर्धनाचे कार्य करायला हवे ! – श्री. धनराज विसपुते (महाराष्ट्र प्रदेश संयोजक, पदवीधर प्रकोष्ठ, भाजप)

नवीन पनवेल (रायगड) येथील गुरुपौर्णिमा महोत्सव

श्री. धनराज विसपुते

श्री. धनराज विसपुते हे ‘श्री ऋषिकेश शिक्षण प्रसारक मंडळा’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात पुष्कळ कार्य केले आहे. ते भाजपच्या पदवीधर प्रकोष्ठाचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक आहेत. नवीन पनवेल (जिल्हा रायगड) येथे सनातन संस्थेच्या वतीने साजर्‍या झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ते वक्ते म्हणून उपस्थित होते. तेव्हा त्यांनी सनातन संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.

‘मी सनातन संस्थेला मागील २५ वर्षांपासून ओळखत आहे. जेव्हा देवद (पनवेल) येथे सनातनचा आश्रम बांधण्याचे काम चालू होते, तेव्हापासून आम्ही संस्थेचे कार्य बघत आहोत. आज सरकारने सनातन संस्थेला समवेत घेऊन महाविद्यालये आणि विद्यापिठे यांत संस्कृती-संवर्धनाचे कार्य करायला हवे; कारण आम्ही केवळ सरकारने सांगितलेल्या चौकटीत राहून पुस्तकी शिक्षण देत आहोत; परंतु सनातन संस्था समाज घडवण्याचे कार्य करत आहे. आम्हाला ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले. तेथेही अप्रतिम नियोजन आणि आपुलकी अनुभवता आली. ‘सनातन संस्थेशी जोडले जाणे’, हे आमचे भाग्यच आहे.’ – श्री. धनराज विसपुते, नवीन पनवेल, रायगड. (१६.७.२०२५)

Leave a Comment