केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने २ ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

सुभेदार श्री. मनीष (निवृत्त) यांचा सत्कार करतांना प्रवचनकार श्री. मुकेश कुलंबुकाटु

कन्नूर (केरळ) – केरळ राज्यात सनातन संस्थेच्या वतीने कन्नूर आणि एर्नाकुलम् येथे २ ठिकाणी १० जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कन्नूर येथे हिंदुत्वनिष्ठ श्री. मुकेश कुलंबुकाटु, तर एर्नाकुलम् येथे ‘एबीसी न्यूज चॅनल’चे मुख्य संपादक श्री. सुनील वडयार मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. कन्नूर येथे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे कमांडो आणि ‘शौर्यचक्र’पदक प्राप्त सुभेदार श्री. मनीष (निवृत्त) यांचा सत्कार करण्यात आला. कन्नूर येथील गुरुपौर्णिमेत सनातन संस्थेच्या वतीने सुश्री रश्मी परमेश्वरन् यांनी, तर एर्नाकुलम् येथे कु. अदिती सुखटणकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

प्रमुख वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन

१. श्री. मुकेश कुलंबुकाटु, हिंदुत्वनिष्ठ

मी अनेक ठिकाणी प्रवचनाला जातो; पण या कार्यक्रमाला मला अत्यंत आपुलकीने बोलवण्यात आल्यामुळे आणि सनातन संस्था अध्यात्मप्रसाराचे कार्य चांगले करत असल्यामुळे ‘मला इथे आलेच पाहिजे’, असे वाटत होते. धर्म टिकला, तरच राष्ट्र आणि राष्ट्र असेल, तरच धर्म टिकू शकतो.

२. श्री. सुनील वडयार, मुख्य संपादक, ‘एबीसी न्यूज चॅनल’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जे सांगितले आहे, ते आपण कृतीत आणायला हवे. केवळ साधना नाही, तर राष्ट्र-धर्मासाठीही आपण लढायला हवे. आज समाजाची स्थिती पुष्कळ खराब आहे. आपण सर्वांनी त्यासाठी एकत्र येऊन कार्य करायला हवे. हिंदूंनी आता लढणे, ही काळाची आवश्यकता आहे.

Leave a Comment