पुणे, १२ जुलै (वार्ता) : स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव आयोजित रौप्यमहोत्सवी ४ दिवसीय सोहळ्याचे १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. गेल्या २५ वर्षांच्या या वाटचालीमध्ये मंचाने राबवलेल्या विविध उपक्रमांमध्ये ज्या व्यक्ती आणि संस्था यांनी तन, मन, धनाने सहकार्य केले अन् संघटनेच्या कार्याला बळ दिले, त्यामुळे ही २५ वर्षांची वाटचाल यशस्वी झाली, अशा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. नीलेश लोणकर यांनी केले होते. १२ जुलै या दिवशी ‘भिमापाटस साखर कारखान्या’चे उपाध्यक्ष श्री. आनंदजी थोरात, तसेच ‘हेडगेवार स्मृती समिती, दौंड’चे अध्यक्ष देवदत्त शेणालीकर, ‘चौरंगीनाथ महाराज संस्थान केडगाव’चे मठाधिपती लक्ष्मणनाथजी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ‘सरसेनापती हंबीरराव मोहिते गोशाळे’चे संस्थापक श्री. पंडितदादा मोडक हेही उपस्थित होते. या कार्यक्रमाला ३०० हून अधिक जिज्ञासू उपस्थित होती. उपस्थित सर्व मान्यवरांनी सभागृहातील शस्त्रप्रदर्शन, ग्रंथप्रदर्शन कक्ष यांनासुद्धा भेटी दिल्या.

आमदार राहुल कुल यांची सनातनच्या सात्त्विक उत्पादन कक्षाला भेट !
या ठिकाणी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. त्या कक्षाला दौंडचे विद्यमान आमदार श्री. राहुलजी कुल यांनी भेट दिली. या वेळी त्यांना ‘नामजप कोणता करावा ?’ हा ग्रंथ आणि ‘सनातन प्रभात’ दैनिक भेट देण्यात आले.
सनातन निर्मित ग्रंथ सरकारी अनुदानातून ग्रंथालयांमध्ये जर उपलब्ध झाले, तर सर्वसामान्यांपर्यंत हे सर्व धर्मशिक्षण पोचेल, असे आमदार श्री. राहुल कुल यांना सांगितल्यावर ही संकल्पना त्यांना पुष्कळ आवडली. याच विचारांकडे आणि संस्कृतीकडे पुढे समाज वळणार आहे, असे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.

१३ जुलै या दिवशीच्या कार्यक्रमात सद्गुरु आणि संत यांची वंदनीय उपस्थिती !
१३ जुलै या दिवशीच्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची वंदनीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आरंभी सद्गुरु स्वाती खाड्ये, श्री. सुनील घनवट, पू. (सौ.) मनीषा पाठक, श्री. महेश पाठक यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी ‘सव्यसाची गुरुकुलम्’ या संस्थेचे यांचे शस्त्रप्रदर्शन पाहिले. त्यानंतर सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन केले.


मान्यवरांचा सत्कार
१२ जुलै या दिवशी करण्यात आलेले सत्कार
‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून धर्म आणि राष्ट्र रक्षणासाठी सेवा तत्पर असलेले ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. सुनील ओजाळे यांचा सत्कार श्री. विद्याधर नारगोलकर यांनी केला, तसेच श्री. सुनील ओजाळे हे स्वा. सावरकर युवा मंचच्या स्वयंभू मासिकातील लेखनासाठी नियमितपणे सहकार्यही करत आहेत.

१३ जुलै या दिवशी करण्यात आलेले सत्कार
सौ. अंजली लोणकर यांनी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांचा सत्कार केला.

सनातन संस्थेकडून डॉ. नीलेश लोणकर यांचा सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी डॉ. नीलेश लोणकर यांना सनातन संस्थेचे संस्थापक ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे संक्षिप्त चरित्र’ हा ग्रंथ भेट देण्यात आला.

साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्याचा जागर...