श्रीरामनवमीच्या दिवशी करावयाचा नामजप आणि स्तोत्रपठण !

२.४.२०२० या दिवशी श्रीरामनवमी आहे. या दिवशी श्रीरामाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. सप्तर्षींच्या आज्ञेनुसार या दिवशी पुढील नामजप आणि स्तोत्रपठण करण्याची संधी साधकांना मिळत आहे. सर्वांनी भावपूर्णरित्या ते करून श्रीरामाची कृपा संपादन करावी.

आदित्यहृदय स्तोत्र

सध्या साधकांना ७ व्या पाताळातील वाईट शक्ती मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. या त्रासांमुळे काही साधकांना छातीवर दाब जाणवणे, श्‍वास घेतांना त्रास होणे, अस्वस्थ वाटणे, छातीत कळा येणे, यांसारखे त्रास होतात. प्राणवहनपद्धतीने नामजप शोधून काढेपर्यंत साधक पुढील आध्यात्मिक उपाय करू शकतात.

प्रतिदिन दुर्गा सप्तशती पोथीतील देवीकवच म्हणा !

आपत्कालात देहाचे रक्षण होण्यासाठी, तसेच अनेक व्याधींपासून (हाडेदुखी, स्नायूदुखी, अनेक दुर्धर आजार, रक्तव्याधी) मुक्त होण्यासाठी साधकांनी प्रतिदिन दुर्गा सप्तशतीमधील चण्डिकवच (देवीकवच) म्हणणे आवश्यक आहे.