सनातनचे ग्रंथप्रदर्शनातील कार्य आमच्यासारख्या लोकांनी यापूर्वीच चालू करायला हवे होते ! – महामंडलेश्‍वर श्री स्वामी रुद्रदेवानंद महाराज, वृंदावन, उत्तरप्रदेश

सनातनचे प्रदर्शन पाहिल्यानंतर माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले. आमच्यासारख्या लोकांनी हे कार्य यापूर्वीच चालू करायला हवे होते. तुम्ही हे कार्य केले, ते पुष्कळ चांगले झाले. आम्ही तन, मन आणि धन यांनी तुमच्यासमवेत आहोत. या कार्याला अधिकाधिक पुढे नेले पाहिजे.

सनातन संस्थेचे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना स्वतःवर होणार्‍या अन्यायाची जाणीव होईल ! – महंत श्री सुंदरदासजी महाराज

सनातनचे प्रदर्शन पुष्कळ चांगले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर हिंदूंना आध्यात्मिक माहितीसमवेत त्यांच्यावर कशा प्रकारे आणि का अत्याचार होत आहेत, याची माहिती मिळेल. हे प्रदर्शन पाहून ‘आपल्यावर कशाप्रकारे अन्याय होत आहे’, याची हिंदूंना जाणीव होऊन त्यांच्यात जागृती होईल.

सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनामुळे लोक धर्माचरण करू लागतील ! – स्वामी प्रेम परमानंद महाराज

उज्जैन येथील कल्याण आश्रमचे स्वामी प्रेम परमानंद महाराज यांनी ११ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक प्रदर्शनाला भेट दिली.

सनातनचे साहित्य, संशोधन आणि शिक्षण पुष्कळ उच्च प्रतीचे आहे ! – महामंडलेश्‍वर स्वामी दयानंददास महाराज, शक्तीधाम आश्रम

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेले ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना महामंडलेश्वर स्वामी दयानंददास महाराज भेट यांनी दिली.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनातील माहितीचा अभ्यास करून हिंदू धर्माचरण करतील ! – श्री श्री १००८ श्री महामंडलेश्‍वर माँ सतीगिरीजी

रिद्वार येथील त्रिलोकीनाथ विश्व सेवा संस्थान आणि १०८ फिट दुर्गा मूर्ती आश्रमाच्या श्री श्री १००८ श्री महामंडलेश्वर माँ सतीगिरीजी यांनी ११ फेब्रुवारीला सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला भेट दिली.

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून चांगले कार्य होत आहे’ – श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज

हरिद्वार येथील कनखल मधील श्री पंचायती निर्मला आखाड्याचे श्री महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज यांची सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने कुंभनगरी येथे लावण्यात आलेल्या अनुक्रमे ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट

सनातनच्या प्रदर्शनातून हिंदूंमध्ये जागृती होऊन त्यांची उन्नती होईल ! – श्री बलदेवाचार्यजी महाराज, राजस्थान

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला श्री बलदेवाचार्यजी महाराज यांनी भेट दिली.

‘श्री राजमातंगी यज्ञा’चा यज्ञातील अन्य घटकांच्या तुलनेत श्री राजमातंगीदेवीचे चित्र आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञाच्या वेळी परिधान केलेली पोपटी रंगाची साडी यांवर अधिक प्रमाणात सकारात्मक परिणाम होणे

‘श्री राजमातंगी यज्ञाचा यज्ञातील घटकांवर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सनातन संस्था मनुष्याच्या अंधकाराला दूर करत आहे ! – श्री ललितानंदगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड

हरिद्वार येथील भारतमाता मंदिराचे श्री ललितानंदगिरीजी महाराज यांनी प्रयागराज येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनास नुकतीच भेट दिली.

सनातनचे ग्रंथ भारताची काया पालटू शकतात ! – आचार्य सतीश शास्त्री, प्रवचनकार, पठाणकोट, पंजाब

पंजाबच्या पठाणकोट येथील प्रवचनकार आचार्य सतीश शास्त्री यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ‘ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक’ प्रदर्शनाला भेट दिली.