परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यारख्या उच्च कोटीच्या संतांवर सध्या प्रसिद्धीमाध्यमांतून अत्यंत हीन आरोप होत आहेत. सनातन संस्थेवर आतापर्यंत एकाही प्रकरणात साधे आरोपपत्रही दाखल झालेले नसतांना माध्यमे ‘सनातन संस्थेच्या संस्थापकांना कधी अटक होणार’, अशा प्रकारची राळ उठवत आहेत. वास्तविक परात्पर गुरु डॉक्टरांचे जीवनकार्य पहाता त्यांच्या समोर उभे रहाण्याचीही माध्यमकर्मींची पात्रता नाही. माध्यमांतून गेल्या काही दिवसांत ‘कोण आहेत डॉ. आठवले’, अशा तळटीपा दाखवून समाजाला संभ्रमित करण्याचा प्रयत्न झाला. आम्हीही याच प्रश्नाचे उत्तर समाजाला देण्यासाठी येथे परात्पर गुरु डॉक्टरांची संक्षिप्त माहिती, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या वा त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या संस्था, संघटना आदींच्या कार्याची माहिती दिली आहे. एका व्यक्तीकडून अल्पावधीत केवळ राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातच नव्हे, तर सूक्ष्म-जगताच्या संदर्भातही एवढे सर्वव्यापी कार्य होणे, ही खरे तर अशक्य कोटीतीलच गोष्ट आहे. यावरून परात्पर गुरु डॉक्टरांचे असामान्यत्व आणि आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचा सर्वमान्य अधिकारही लक्षात येईल. पुढे दिलेल्या माहितीमुळे वाचकांना अध्यात्म जाणून घेण्याची ओढ निर्माण होऊन ते साधना करण्यास प्रवृत्त होण्यास साहाय्यही होईल.
१. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ
१ अ. वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर यशस्वी संशोधन
१ अ १. संमोहन-उपचारांतील नाविन्यपूर्ण संशोधन
१ आ. वर्ष १९८२ मध्ये ‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्थे’ची स्थापना
१ इ. संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांवर ६ ग्रंथ प्रकाशित !
२. साधनेविषयीच्या मार्गदर्शनासाठी
‘सनातन भारतीय संस्कृती संस्थे’ची स्थापना (१.८.१९९१)
२ अ. वर्ष १९९५ पर्यंत महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत अध्यात्माचे अभ्यासवर्ग घेणे, गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करणे इत्यादी
२ आ. वर्ष १९९६ ते वर्ष १९९८ या काळात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांत ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज जागृत करणार्या साधनेविषयीच्या शेकडो जाहीर सभा घेणे
३. शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती
३. अ. यात सांप्रदायिक साधनेत सांगितली जाते, त्याप्रमाणे सर्वांना एकच साधना सांगितली जात नसून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ या सिद्धांतानुसार साधना सांगितली जाते.
३. आ. ‘अष्टांगसाधना (स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, नामजप, सत्संग, सत्सेवा, भावजागृतीसाठी प्रयत्न, सत्साठी त्याग आणि प्रीती)’, हे या साधनामार्गाचे ठळक वैशिष्ट्य आहे.
४. साधना, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आदी
विविध विषयांवर विपुल ग्रंथ-निर्मिती आणि ग्रंथ-प्रकाशन
अध्यात्म, धर्म, देवता, धर्मजागृती, राष्ट्ररक्षण आदी विषयांवर मे २०२० पर्यंत सनातनच्या ३२३ ग्रंथांच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलुगु, मल्ल्याळम्, बंगाली, ओडिया, आसामी, गुरुमुखी, सर्बियन, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच आणि नेपाळी या १७ भाषांत ७९ लाख ८१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत.
४ अ. सनातनच्या ग्रंथांची काही ठळक वैशिष्ट्ये
१. काळानुसार आवश्यक अशा योग्य साधनेची शिकवण !
२. साधनेतील अडचणी दूर करून साधनेला दिशा देणारे मार्गदर्शन !
३. अध्यात्मातील प्रत्येक कृतीविषयी ‘का अन् कसे’ यांची शास्त्रीय उत्तरे
४. विज्ञानयुगातील वाचकांना समजेल अशा आधुनिक वैज्ञानिक (उदा. सारणी, टक्केवारी) भाषेतून ज्ञान !
सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला विज्ञानाच्या भाषेत समजावल्यास तिला विषय लवकर समजतो. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर शास्त्रीय परिभाषेत ग्रंथ लिहितात. त्या ग्रंथांत विषय स्पष्ट होण्यासाठी आकृत्या, सारण्या, टक्केवारी, सूक्ष्मसंबंधीचे प्रयोग आदी असतात, तसेच लिखाणाची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने असते.
४ अ. टक्केवारीचे उदाहरण : गुरुकृपायोगात सांगितलेल्या अष्टांग-साधनेतील घटकांचे व्यष्टी आणि समष्टी साधनेतील महत्त्व
४ आ. सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी
‘सनातनचा प्रत्येक ग्रंथ हा ‘अध्यात्म विश्वविद्यालयाचे पाठ्यपुस्तक’ असल्याने ग्रंथांतील लिखाण १, १ अ, १ अ १, १ अ १ अ… अशा सूत्रबद्ध पद्धतीने मांडलेले असते.
५. तात्त्विक विवेचनच नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन !
६. व्यक्तीने साधना केल्याने तिच्यावर होणारे चांगले परिणाम; इंग्रजी अक्षरे नव्हेत, तर देवनागरी अक्षरे सात्त्विक असणे; तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य आदींविषयी वैज्ञानिक उपकरणांद्वारे केलेल्या संशोधनाचा अंतर्भाव !
७. सात्त्विक वेशभूषा, आहार, इत्यादींचा व्यक्तीवर होणारा चांगला परिणाम आदींच्या संदर्भातील सूक्ष्म स्तरावरील प्रक्रिया दर्शवणारी चित्रे अन् लिखाण !
८. सनातनच्या बर्याच ग्रंथांतील २० टक्के ज्ञान हे आतापर्यंत पृथ्वीवर कोठेही उपलब्ध नसलेले, असे अद्वितीय आहे !
५. व्यापक अध्यात्मप्रसारासाठी ‘सनातन संस्थे’ची स्थापना (२२.३.१९९९)
५ अ. व्यक्तीला होणार्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांची मूळ कारणे म्हणजे ‘प्रारब्ध आणि वाईट शक्ती’ असल्याचे लक्षात आणून देणे, तसेच त्यांवरील कायमस्वरूपी उपाय असलेली ‘साधना’ सांगणे
५ आ. जिज्ञासू आणि साधक यांना सकाम साधनेत अडकू न देता निष्काम साधना शिकवून ईश्वरप्राप्तीची दिशा दाखवणे
५ आ १. व्यावहारिक लाभासाठी किंवा अडचणींच्या संदर्भात उपाय न सांगता केवळ साधनेच्या संदर्भात आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शन करणे
५ इ. साधनेच्या संदर्भातील अडचणी आणि त्रास यांच्या संदर्भात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अडथळे शोधून त्यानुसार उपाय सांगणे
५ ई. सत्संग, व्याख्याने आदींचे आयोजन करणे; कुंभमेळ्यांमध्ये अध्यात्मप्रसार करणे; धर्मप्रसारकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी यज्ञयाग, धार्मिक विधी आदी करणे; दूरचित्रवाहिन्यांवरून हिंदु धर्माची बाजू मांडणे आणि त्यासाठी ‘वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा’ आयोजित करणे इत्यादी
५ उ. बुद्धीने समजणार्या ज्ञानापलीकडे जाऊन ज्ञान मिळवणे (From Known to UnKnown ), उदा. ‘एखाद्या मूर्तीमध्ये देवतेच्या तत्त्वाचे प्रमाण किती आहे’, याविषयी ध्यानाद्वारे किंवा सूक्ष्मातून ज्ञान मिळवणे
५ ऊ. सनातन संस्थेचे संकेतस्थळ – Sanatan.org : प्रतिमास १ लक्ष २५ सहस्रांहून अधिक वाचकसंख्या असलेले हे संकेतस्थळ मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, कन्नड आणि इंग्रजी या सहा भाषांत कार्यरत असून ते १८० देशांत पाहिले जाते. अध्यात्मशास्त्र, हिंदु धर्म, देवता, साधना, आचारपालन आदींविषयीची माहिती या संकेतस्थळावर दिली आहे.
६. साधक घडवणे
ईश्वरप्राप्तीसाठी, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करणारे सहस्रो साधक घडवणे
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या साधनेच्या योग्य
मार्गदर्शनामुळे साधकांची आध्यात्मिक क्षमता वाढणे,त्यांची शीघ्र आध्यात्मिक
उन्नती होणे, तसेच काही साधक संतपदी (गुरुपदी) आणि सद्गुरुपदी आरूढ होणे
७ अ. साधकांची आध्यात्मिक क्षमता वाढणे
काही साधकांना अध्यात्मातील विविध विषयांवर पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेले ज्ञान सूक्ष्मातून मिळते काही साधक एखाद्या वस्तूचे किंवा घटनेचे सूक्ष्म परीक्षण करतात. (अशा वेळी त्या साधकांना ती वस्तू किंवा घटना यांच्याविषयी सूक्ष्मातून ज्ञान मिळते.) काही साधक दुसर्यांची आध्यात्मिक पातळी ओळखू शकतात. काही साधकांना सूक्ष्मातील चांगली अन् वाईट स्पंदने ओळखता येतात, तसेच चांगल्या आणि वाईट शक्तींचे प्रकटीकरण (चांगल्या वा वाईट शक्तींमुळे होणार्या व्यक्तीच्या हालचाली, हावभाव, हसणे, बोलणे इत्यादी) ओळखता येते, तर काही साधकांना वाईट शक्तींच्या प्रकटीकरणावर उपायही (उदा. कोणता नामजप करावा ?) सांगता येतात.
७ आ. साधकांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणे
मार्च २०२० पर्यंत १०४ साधक संतपदी आरूढ झाले आहेत, तर ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक स्तर असलेले १,१६३ साधक संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
अन्य संप्रदाय आणि सनातन यांतील भेद !
परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक संत आणि साधक यांना घडवले असल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांप्रमाणेच सनातनचे संत आणि साधक यांच्याविषयीही विपुल लिखाण प्रसिद्ध होणे : बहुतेक संप्रदायांत केवळ त्यांच्या प्रमुखांबद्दल माहिती असते, शिष्यांबद्दल नसते. परात्पर गुरु डॉक्टरांनी अनेक संत आणि साधक यांना घडवले असल्यामुळे सनातनचे संत आणि साधक यांनी केलेले मार्गदर्शन, त्यांचे विचार, त्यांनी केलेली काव्ये, त्यांच्याविषयी इतर साधकांना आलेल्या अनुभूती इत्यादी विपुल लिखाण ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध होत असते. परात्पर गुरु डॉक्टर आता सनातनच्या संतांची चरित्रेही प्रसिद्ध करणार आहेत.
८. गुरुकुलासम असलेल्या ‘सनातन आश्रमा’ची निर्मिती आणि
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेरणेमुळे अन्य आश्रमांची स्थापना !
परात्पर गुरु डॉक्टरांनी रामनाथी (गोवा) येथे तीर्थक्षेत्रासम चैतन्याची अनुभूती देणार्या आश्रमाची निर्मिती केली असून त्यांच्या प्रेरणेमुळे महाराष्ट्रातील पनवेल आणि मिरज येथेही आश्रम स्थापन झाले आहेत. या आश्रमांत आणि अन्य ठिकाणी मिळून अनुमाने १ सहस्र पूर्णवेळ साधक साधनारत असून येथे राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे कार्यही चालते.
९. साधनेविषयी मार्गदर्शन करणार्या ध्वनीचकत्या (ऑडिओ सीडी)
आणि धर्मशिक्षण देणार्या ४०० हून अधिक ध्वनीचित्र-चकत्या (व्हिडिओ
सीडी) यांची निर्मिती, तसेच राष्ट्र अन् धर्म यांच्या जागृतीपर काही लघुपटांची निर्मिती
१०. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रेरणास्थान (न्यासाची स्थापना : २२.३.२०१४)
१० अ. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे उद्देश : तक्षशिला आणि नालंदा यांच्यासम होणारे हे संकल्पित विश्वविद्यालय अध्यात्माच्या सर्व अंगांचे उच्च शिक्षण देणे, आध्यात्मिक संशोधन करणे, हिंदु धर्माचा प्रसार करणे, जिज्ञासूंना साधनेविषयी योग्य मार्गदर्शन करून त्यांची शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती करवून घेणे आदींसाठी कटीबद्ध आहे. अशा प्रकारचे शिक्षण देणारे एकही विद्यापीठ सध्या जगात नाही !
१० आ. ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण : सध्या चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्य आदी काही कलांच्या माध्यमातून साधना करणार्यांना ईश्वरप्राप्तीच्या दृष्टीतून शिक्षण दिले जात आहे.
१० इ. हिंदु संस्कृतीचे श्रेष्ठत्व आणि अध्यात्माचे महत्त्व सिद्ध करणारे संशोधन अन् त्यांवरील शोधप्रबंधांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये सादरीकरण : या विश्वविद्यालयाद्वारे ‘हिंदु धर्मातील नामजप, यज्ञ, आहार, वेशभूषा, केशभूषा, श्राद्ध आदींचे व्यक्ती आणि वातावरण यांवर होणारे चांगले परिणाम’ यांविषयी वैज्ञानिक उपकरणे आणि संगणकीय तंत्रज्ञान यांद्वारे संशोधनात्मक चाचण्या केल्या जातात. जुलै २०१८ पर्यंत अशा २,२५२ संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे विश्लेषण करून २७६ संशोधन अहवाल सिद्ध करण्यात आले आहेत, तसेच त्यांविषयी ऑक्टोबर २०१६ पासून ५.९.२०१८ पर्यंत ८ राष्ट्रीय आणि १८ आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांत शोधप्रबंधही सादर करण्यात आले आहेत.
१० ई. आध्यात्मिक कार्यशाळांचे आयोजन : नियमित साधना करणार्या साधकांना साधनेविषयी पुढील टप्प्याचे मार्गदर्शन आवश्यक असते. या कार्यशाळांच्या माध्यमातून अशा साधकांना ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’, ‘आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ करावयाचे उपाय’ यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते.
१० उ. प्राचीन काळी जगभर पसरलेल्या हिंदु संस्कृतीचा शोध (मागोवा) घेण्यासाठी अभ्यासदौरे करणे : विश्वविद्यालयाद्वारे प्राचीन काळापासून देश-विदेशांत पसरलेल्या हिंदु संस्कृतीच्या पाऊलखुणा शोधणे (उदा. श्रीलंकेतील रामायणकालीन स्थळांचा संदर्भ अभ्यासणे, अंकोर वाट (कंबोडिया) मंदिरासारख्या प्राचीन मंदिरांना भेटी देणे), त्यासंदर्भातील चित्रीकरण करणे आणि जाणकारांच्या मुलाखती घेणे आदी माध्यमांतून हिंदु संस्कृतीचे प्राचीनत्व आणि माहात्म्य यांचा अभ्यास करण्याचे अमूल्य कार्य चालू आहे.
१० ऊ. भव्य ग्रंथालयाची निर्मिती : या ग्रंथालयासाठी आतापर्यंत इतिहास, संस्कृती, कला, ज्योतिष, आयुर्वेद, विविध साधनामार्ग आदी विषयांवरील संशोधनात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण असे २० सहस्रांहून अधिक ग्रंथ जमा झाले आहेत.
१० ए. इंग्रजी भाषेतील संकेतस्थळ : Spiritual.University (या विश्वविद्यालयाची वास्तू येत्या काही वर्षांतच उभी राहील.)
१० ऐ. आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मूल्य असलेल्या सहस्रो वस्तूंचे जतन करणार्या जगातील एकमेवाद्वितीय अशा संग्रहालयाच्या निर्मितीचे
कार्य : या संग्रहालयासाठी भारतातील तीर्थक्षेत्रे, देवळे, संतांचे मठ, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे इत्यादी ठिकाणच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, माती, पाणी आदी, तसेच चांगल्या आणि वाईट शक्तींचा परिणाम दर्शवणार्या १५ सहस्रांहून अधिक वस्तू, सहस्रावधी छायाचित्रे आणि २७ सहस्रांहून अधिक ध्वनीचित्रफिती होतील, एवढे ध्वनीचित्रीकरण (एकूण ३४३ टेराबाईट) यांचे आजपर्यंत जतन करण्यात आले आहे.
११. वाईट शक्तींचे प्रकार आणि त्यांचे कार्य यांविषयी विविधांगी संशोधन
११ अ. वाईट शक्तींच्या योनींपैकी पाताळांतील ‘मांत्रिक’ या बलाढ्य वाईट शक्तींची जगाला ओळख करून देणे
११ आ. वाईट शक्तींची शक्ती टक्केवारीत मोजण्याची पद्धत
११ इ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांचा त्रास न्यून होण्यासाठी विविध आध्यात्मिक प्रयोग करणे, उदा. गायन, वादन, नृत्य इत्यादी.
११ ई. साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींकडे असलेल्या ज्ञानाचा उपयोग समष्टीसाठी करणे
१२. शारीरिक, मानसिक, तसेच वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपायपद्धतींविषयी संशोधन
१२ अ. आध्यात्मिक उपायांच्या नवनवीन पद्धतींचा शोध लावणे
१. नामजप उपायांच्या विविध पद्धतींचा शोध, उदा. ‘एक-आड-एक’ असे दोन नामजप करणे
२. देवतांच्या सात्त्विक नामजप-पट्ट्यांचे उपाय (देहशुद्धी, वास्तूशुद्धी आणि वाहनशुद्धी करण्याच्या पद्धतींसह)
३. शरिरातील कुंडलिनीचक्रांच्या स्थानी देवतांची सात्त्विक चित्रे किंवा नामजप-पट्ट्या लावणे
४. सनातन-निर्मित सात्त्विक गणेशमूर्तीला प्रदक्षिणा घालणे
५. संतांनी बराच काळ निवास केलेल्या वास्तूत किंवा खोलीत बसून नामजप करणे
६. संतांनी बराच काळ वापरलेल्या वस्तूंचा आध्यात्मिक उपायांसाठी वापर करणे
७. पंचतत्त्वांनुसार (पंचमहाभूतांनुसार) उपाय : उदाहरणे पृथ्वीतत्त्वाचा उपाय : कपाळाला सात्त्विक कुंकू लावणे, आपतत्त्वाचा उपाय : तीर्थ प्राशन करणे, तेजतत्त्वाचा उपाय : विभूती लावणे, वायुतत्त्वाचा उपाय : विभूती फुंकरणे आणि आकाशतत्त्वाचा उपाय : संतांच्या आवाजातील भजने ऐकणे.
१२ आ. विकार-निर्मूलन आणि आध्यात्मिक त्रासनिवारण यांसाठी विविध उपायपद्धतींचा शोध
१. स्पर्शविरहित बिंदूदाबन (अॅक्युप्रेशर) : या पद्धतीनुसार चांगली आध्यात्मिक पातळी असलेला साधक रुग्णाला स्पर्श न करता (थोड्या दूर अंतरावरून) रुग्णावर अधिक प्रभावीपणे बिंदूदाबन उपाय करू शकतो.
२. रिकाम्या खोक्यांचे उपाय : रिकाम्या खोक्यात पोकळी असून पोकळीत आकाशतत्त्व असते. या आकाशतत्त्वामुळे उच्च स्तराचे आध्यात्मिक उपाय होतात.
३. प्राणशक्ती (चेतना) वहन उपाय : हाताच्या बोटांतून बाहेर पडणार्या प्राणशक्तीच्या साहाय्याने उपाय करण्याची ही सोपी पद्धत असून या पद्धतीद्वारे स्वतःवर, तसेच दूर अंतरावरील रुग्णावरही उपाय करता येतात.
१३. स्वतःचा (परात्पर गुरु डॉक्टरांचा) देह (नखे, केस आणि
त्वचा), तसेच वापरातील वस्तू यांच्यातील दैवी पालटांविषयी संशोधन
१४. स्वतःच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) महामृत्यूयोगाचा संशोधनात्मक अभ्यास
१५. सूक्ष्म पंचमहाभूतांमुळे घडणार्या बुद्धीअगम्य घटनांचा
अभ्यास, तसेच आधुनिक वैज्ञानिक उपकरणे (उदा. ‘युनिव्हर्सल थर्मो
स्कॅनर’) आणि तंत्रज्ञान (उदा. ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी’) यांद्वारे संशोधन
१६. ‘कलेसाठी कला’ नव्हे, तर ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ याविषयी
मार्गदर्शन आणि चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्य आदी विविध कलांविषयी संशोधन
१६ अ. साधकांना कलेतील कौशल्य वाढवण्यासह साधनेतील प्रगतीविषयीही मार्गदर्शन : परात्पर गुरु डॉक्टर चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्य, ध्वनीचित्रीकरण इत्यादी विषयांत साधकांचे केवळ त्या त्या क्षेत्रातील प्रावीण्य वाढावे, यासाठी मार्गदर्शन करत नाहीत, तर त्या माध्यमातून साधकांची साधनेत प्रगती व्हावी, यासाठीही मार्गदर्शन करतात.
१६ आ. चित्रकला आणि मूर्तीकला : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या देवतांच्या चित्रांत २७ ते ३१.३ टक्के, तर श्री गणेशमूर्तीत २८.३ टक्के इतके त्या त्या देवतेचे तत्त्व आले आहे. (कलियुगात देवतेच्या चित्रात किंवा मूर्तीत अधिकाधिक ३० टक्के एवढेच त्या त्या देवतेचे तत्त्व येऊ शकते.) परात्पर गुरु डॉक्टर चित्रे आणि मूर्ती यांत ‘शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने किती प्रमाणात आहेत’, हेही सांगतात.
१६ आ १. सूक्ष्म चित्रकला : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी सूक्ष्मातून जे जाणवते किंवा अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीचे चित्रांकन’ म्हणजे ‘सूक्ष्म चित्रकला’ ही चित्रकलेतील अभिनव शाखा परात्पर गुरु डॉक्टरांनी शोधून काढली आणि सूक्ष्म चित्रांकन करण्याची क्षमता असणार्या साधकांना ती शिकवली. परात्पर गुरु डॉक्टरांनी या चित्रांचे विविध प्रकारही (उदा. भासमान चित्र, काल्पनिक चित्र, कलात्मक चित्र, मायावी चित्र आदी प्रकारही) शोधून काढले. सूक्ष्म चित्रांकन करणार्या साधकांनी काढलेल्या सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रांची सत्यता परात्पर गुरु डॉक्टर पडताळतात आणि त्या चित्रांच्या सत्यतेची टक्केवारीही सांगतात.
१६ इ. अक्षरे आणि अंक यांचे लेखन : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली निर्मिलेली देवनागरी अक्षरे आणि अंक यांत ३१ टक्के सात्त्विकता आली आहे. (कलियुगात अक्षरे किंवा अंक यांच्यात अधिकाधिक ३० टक्केच सात्त्विकता येऊ शकते.)
१६ ई. सात्त्विक रांगोळ्या : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या त्या त्या रांगोळ्यांत त्या त्या देवतांचे (श्री गणपति, श्रीकृष्ण, श्री लक्ष्मी, दत्त आणि शिव या देवतांचे) सरासरी ३ ते ४ टक्के तत्त्व आणि चैतन्य, आनंद आदी स्पंदने आली आहेत, तसेच एका रांगोळीत १० टक्के गणेशतत्त्व आले आहे. (कलियुगात रांगोळ्यांत अधिकाधिक १० टक्के देवतातत्त्व आणि शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची स्पंदने येऊ शकतात.)
१६ उ. सात्त्विक मेंदी : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली श्री सरस्वती, श्रीकृष्ण आणि श्री लक्ष्मी यांचे २ ते ४ टक्क्यांपर्यंततत्त्व असलेल्या मेंदीच्या कलाकृती निर्मिल्या आहेत. (कलियुगात मेंदीच्या कलाकृतीमध्ये अधिकाधिक ५ टक्के एवढे देवतातत्त्व येऊ शकते.)
१६ ऊ. संगीत
१६ ऊ १. गायन : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘शास्त्रीय संगीता’पासून ‘विविध दैवी नादां’पर्यंतचा अध्यात्मशास्त्रीय अभ्यास, ‘पाश्चात्त्य संगीत’ आणि ‘भारतीय संगीत’ यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने तुलनात्मक अभ्यास, तसेच संगीताचा व्यक्ती, प्राणी आणि वनस्पती यांवर होणार्या परिणामांचा अभ्यास करण्यात येत आहे. याचसह ‘संगीत-उपायांचा मनुष्याच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांवर होणारा परिणाम’ याविषयीही संशोधन चालू आहे.
१६ ऊ २. वाद्यवादन : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पाश्चात्त्य वाद्यांतून सात्त्विक संगीत निर्माण करणे, तसेच पाश्चात्त्य वाद्य आणि भारतीय वाद्य, संतांनी वाद्य (उदा. वीणा) वाजवणे आणि अन्य व्यक्तीने वाद्य (उदा. वीणा) वाजवणे आदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे.
१६ ए. नृत्य : परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय नृत्यप्रकार’ आणि ‘पाश्चात्त्य नृत्यप्रकार’ यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने तुलनात्मक अभ्यास, तसेच नृत्यातील विविध शारीरिक स्थिती आणि मुद्रा यांचे आध्यात्मिक दृष्टीने संशोधन चालू आहे.
१७. उच्च स्वर्गलोक, महर्लोक आणि जनलोक येथून पृथ्वीवर जन्माला
आलेली दैवी (सात्त्विक) बालके ओळखणे आणि त्यांच्या संबंधी संशोधन
१८. ज्योतिषशास्त्र (फलज्योतिष, हस्तसामुद्रिक आणि पादसामुद्रिक शास्त्र)
आणि नाडीभविष्य (नाडीपट्ट्यांवर लिहून ठेवलेले भविष्य) यांच्याद्वारे विविधांगी संशोधन
१९. स्वभाषारक्षणासाठी दिशादर्शन, भाषेच्या
सूक्ष्म पैलूंविषयी संशोधन आणि भाषेच्या वैशिष्ट्यांचा संग्रह
अ. मराठी लिखाणात परकीय भाषेतील शब्दांचा वापर टाळणे आणि लेखन व्याकरणदृष्ट्या शुद्ध असणे, यांकडे परात्पर गुरु डॉक्टर कटाक्षाने लक्ष देतात.
आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक संशोधन करून ‘मराठी ही संस्कृतनंतर सर्वाधिक सात्त्विक भाषा आहे’, हे दाखवून दिले आहे.
इ. मराठी भाषेतील अनेक अर्थ असलेले शब्द आणि वाक्ये यांचा संग्रह करण्याचे आगळेवेगळे कार्यही त्यांनी केले आहे, उदा. ‘पूज्य’ या शब्दाचे ‘शून्य’ आणि ‘पूजनीय’ असे २ वेगवेगळे अर्थ होतात. ‘चित्र काढले’ या वाक्याचे ‘लेखणीने चित्र काढले’ आणि ‘चित्र भिंतीवरून काढले’, असे २ अर्थ होतात. असे शब्द आणि वाक्ये यांचा हा संग्रह पुढे ग्रंथरूपात प्रकाशित करण्यात येईल.
२०. प्राणी आणि वनस्पती यांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने अभ्यास
२१. साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात जागृती करणारे सनातन पंचांग, संस्कार वही, धर्मशिक्षण फलक आदी प्रसारसाहित्याची निर्मिती
२२. सात्त्विक अशा पूजोपयोगी (उदा. कुंकू, अष्टगंध, अत्तर, कापूर, उदबत्ती) आणि नित्योपयोगी (उदा. दंतमंजन, उटणे, शिकेकाई चूर्ण, स्नानाचा साबण, केश तेल) उत्पादनांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन
२३. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या)
स्थापनेसाठी कटीबद्ध असलेले प्रखर हिंदुत्ववादी नियतकालिक
‘सनातन प्रभात’चे संस्थापक आणि प्रथम संपादक (आरंभ ४.४.१९९८)
२३ अ. नियतकालिक ‘सनातन प्रभात’ समूह
दैनिक – मराठी (४ आवृत्त्या)
साप्ताहिक – मराठी आणि कन्नड
पाक्षिक – हिंदी आणि इंग्रजी
मासिक – गुजराती
संकेतस्थळ : SanatanPrabhat.org
(मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड आणि इंग्रजी या भाषांत)
२३ आ. वैशिष्ट्ये
१. आजवर एकाही संप्रदायाने किंवा धार्मिक संस्थेने राष्ट्र अन् धर्म यांच्या जागृतीसाठी दैनिक वर्तमानपत्र, साप्ताहिक, पाक्षिक आणि मासिक अशी नियतकालिके विविध भाषांत चालू केलेली नाहीत.
२. बातम्यांवर ‘राष्ट्राभिमानी आणि धर्माभिमानी वाचकांचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे’, हे कळावे म्हणून बातम्यांवर टिपण्या लिहिण्यास आरंभ केला. असे करणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव नियतकालिक आहे.
२३ इ. ‘इंटरनेेट’वरील (माहितीजालावरील) ‘हिंदु वार्ता’ वृत्तवाहिनीचे संकल्पक : २९.१२.२०१४ ते २९.१.२०१६ या कालावधीत ‘हिंदु वार्ता’ या उपक्रमाद्वारे हिंदूंच्या वृत्तवाहिनीचा पाया रचला गेला.
२४. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या (ईश्वरी राज्याच्या) स्थापनेसाठी कार्य
२४ अ. लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी वैध मार्गाने कार्य
२४ आ. हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीच्या ग्रंथमालिकेची निर्मिती, तसेच नियतकालिके आणि संकेतस्थळे यांद्वारे मार्गदर्शन
२४ इ. संत, संप्रदाय, हिंदुत्ववादी, देशभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे संघटन आणि त्यांना आध्यात्मिक स्तरावर दिशादर्शन
२४ ई. आध्यात्मिक स्तरावरील कार्य
२४ ई १. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाने कार्य होणे : अत्युच्च कोटीतील संतांच्या केवळ अस्तित्वानेही कार्य होत असते. त्यामुळेच प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉक्टर कुठेही बाहेर जाऊ शकले नसले, तरी त्यांच्या अस्तित्वाने हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य वृद्धींगत होत आहे, उदा. अनेक संतांचा कार्याला आशीर्वाद लाभत आहे, अनेक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित अन् सक्रीय होत आहेत.
२४ ई २. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी १०० संत घडवत असणे : सध्या पृथ्वीवर हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी चालू असलेल्या सूक्ष्मातील युद्धात देवता आणि संत यांच्याकडून भुवर्लोकापासून ६ व्या पाताळापर्यंतच्या अनिष्ट शक्ती पराभूत झाल्या आहेत. आता ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींना पराभूत करू शकतील, अशा ब्राह्मतेज (आध्यात्मिक बळ) असलेल्या १०० संतांची आवश्यकता आहे. असे संत घडवण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर स्वतः कार्यरत आहेत. ऑगस्ट २०१८ पर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली असे ८५ संत घडले आहेत. येत्या १ – २ वर्षांत ही संख्या १०० होईल. या
१०० संतांच्या माध्यमातून ७ व्या पाताळातील अनिष्ट शक्तींचा पराभव झाल्यानंतरच त्याचा दृश्य परिणाम दिसून येईल, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.
२५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या राष्ट्र आणि धर्म
यांविषयीच्या कार्यातून प्रेरणा घेऊन चालू झालेले कार्य (संघटना आणि उपक्रम)
२५ अ. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ (स्थापना ७.१०.२००२)
२५ अ १. ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्य
अ. हिंदूंना धर्मशिक्षण देणे : यासाठी जुलै २०१८ मध्ये गावोगावी ४४६ विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग कार्यरत
आ. ‘हिंदु धर्मजागृती सभां’चे आयोजन : जुलै २०१८ पर्यंत आयोजित केलेल्या १,४२५ हून अधिक ‘हिंदु धर्मजागृती सभां’मुळे अनुमाने १७ लक्ष ६० सहस्रांहून अधिक हिंदूंमध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती
इ. ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशने’ आणि अन्य ‘हिंदू अधिवेशने’ यांचे आयोजन : या अधिवेशनांद्वारे राज्याराज्यांतील २५० हून अधिक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना संघटित
ई. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी व्यक्तींना कायदेशीर साहाय्य करणार्या धर्मप्रेमी अधिवक्त्यांचे (वकिलांचे) संघटन ‘हिंदु विधीज्ञ परिषद’ (स्थापना १४.६.२०१२)
उ. उद्योगपती परिषद (स्थापना ४.६.२०१८)
ऊ. आरोग्य साहाय्यता समिती (स्थापना (४.६.२०१८)
ए. विनामूल्य प्रथमोपचार आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेणे
ऐ. महिला शाखा – ‘रणरागिणी’ (स्थापना ३.६.२००९)
२५ अ २. संकेतस्थळ – Hindujagruti.org : हिंदूंना धर्मशिक्षण देणे, हिंदूंमध्ये धर्मजागृती करणे, त्यांना हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी मार्गदर्शन करणे आदींसाठी हे संकेतस्थळ कार्यरत आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांत असलेल्या या संकेतस्थळाला प्रतिमास २ लक्षांहून अधिक वाचक भेट देतात. हे संकेतस्थळ १८० हून अधिक देशांत पाहिले जाते.
२५ आ. आदर्श आणि सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी Balsanskar.com
२५ इ. प्रसारमाध्यमांत हिंदु धर्माची बाजू मांडण्यासाठी वक्ते सिद्ध करण्यासाठी ‘सनातन अध्ययन केंद्र’
२५ ई. सात्त्विक पुरोहित सिद्ध करण्यासाठी ‘सनातन पुरोहित पाठशाळा’
२५ उ. अखिल मानवजातीला अध्यात्म शिकवण्यासाठी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्)’ (स्थापना १५.१२.२००५ (ऑस्ट्रेलिया))
२५ उ १. उद्देश
अ. अध्यात्माचा वैज्ञानिक परिभाषेत जगभर प्रसार करणे
आ. आध्यात्मिक संशोधन करणे
इ. विविध पंथांनुसार आणि योगमार्गांनुसार साधना करणार्यांना आध्यात्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणे
ई. मानवी जीवनातील आध्यात्मिक अडचणींच्या निवारणासाठी आध्यात्मिक उपायांचा प्रसार करणे
२५ उ २. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकांनी केलेली आध्यात्मिक प्रगती : ऑगस्ट २०१८ पर्यंत ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे ४ साधक संतपदी आरूढ झाले आहेत, तर ६० टक्के आणि त्याहूनही अधिक आध्यात्मिक पातळी असलेले २० साधक संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहेेत.
२५ उ ३. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संकेतस्थळ – SSRF.org (निर्मिती १४.१.२००६) : या संकेतस्थळावर विविधांगी आध्यात्मिक संशोधन (उदा. विदेशी आचार तामसिक, तर हिंदु आचार सात्त्विक असणे, यासंदर्भातील संशोधन), काळानुसार आवश्यक साधना, व्यक्तीमत्त्व-विकासासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व, वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय आदींविषयी माहिती अन् लेख ठेवण्यात आले आहेत. हे संकेतस्थळ २२ भाषांत (इंग्रजी, चिनी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश इत्यादी) उपलब्ध आहे. सुमारे ५ लक्ष दर्शक असलेले हे संकेतस्थळ जगातील १९६ देशांत पाहिले जाते.
परात्पर गुरु डॉक्टरांनी धर्मप्रसाराची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवणे
आरंभी परात्पर गुरु डॉक्टरांनी जिज्ञासू आणि साधक यांना साधना शिकवण्यासाठी त्यांच्यासाठी स्वतः सत्संग आणि अभ्यासवर्ग घेतले, तसेच ‘साधना’ या विषयावर जाहीर सभाही घेतल्या. पुढे राष्ट्ररक्षणार्थ सर्व धर्मियांचे योगदान मिळण्यासाठी ‘सर्वधर्म सत्संग’, तर धर्मरक्षणासाठी ‘सर्वसंप्रदाय सत्संग’ आयोजित केले. त्यानंतर त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली ‘हिंदु जनजागृती समिती’ धर्मशिक्षणवर्ग, ‘हिंदु धर्मजागृती सभा’ आदींच्या माध्यमातून भारतभर व्यापक धर्मप्रसार करत आहे. त्यांच्याच प्रेरणेतून स्थापन झालेली ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्)’ ही संस्था संकेतस्थळ, ‘ऑनलाईन सत्संग’ आदींच्या माध्यमातून जगभर धर्मप्रसार करत आहे.
२६. भावी भीषण आपत्काळाच्या दृष्टीकोनातून कार्य
२६ अ. भावी भीषण संकटकाळाचा विचार द्रष्टेपणाने अनेक वर्षे आधीच करून संकटकाळात आधुनिक वैद्य (डॉक्टर), वैद्य, औषधे आदी उपलब्ध होणार नसल्याने जीवितरक्षणासाठी उपयुक्त ठरणार्या विविध उपचारपद्धतींविषयीची विपुल माहिती संग्रहित करणे आणि पुढे त्याविषयी ग्रंथही प्रसिद्ध करणे
२६ आ. प्रथमोपचार प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण आणि अग्नीशमन प्रशिक्षण यांविषयी जनजागृती करणे
२६ इ. ‘भावी भीषण संकटकाळात जीवितरक्षण होण्यासाठी आतापासूनच साधना करण्याला पर्याय नाही’, हे समाजमनावर बिंबवणे
२७. ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे कार्य जगभर पसरणार
आहे’, असे गौरवोद्गार नाडीपट्टी-वाचक आणि ज्योतिषी यांनी काढणे
अ. तमिळनाडूतील पू. डॉ. ॐ उलगनाथन्, पुणे येथील श्री. मुदलियार गुरुजी आदी ५ – ६ नाडीपट्टी-वाचकांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे राष्ट्र आणि धर्म यांचे महान कार्य करत आहेत आणि हे कार्य पुढे पुष्कळ वाढून जगभर होणार आहे’, अशा आशयाचे उद्गार काढले आहेत.
आ. परात्पर गुरु डॉक्टरांची जन्मपत्रिका आणि हाता-पायांचे ठसे ‘ते कोणाचे आहेत’, हे ठाऊक नसतांनाही ते पाहून कल्याण येथील सौ. इंदिरा सोनवणे, डोंबिवली येथील
डॉ. उदयकुमार पाध्ये आदी ७ – ८ ज्योतिषांनीही वरीलप्रमाणेच गौरवोद्गार काढले आहेत.
२८. परात्पर गुरु डॉक्टरांचा महामृत्यूयोग टळावा आणि त्यांच्या राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यातील अडथळे दूर व्हावेत, यासाठी काही संत, नाडीपट्टी-वाचक आणि ज्योतिषी स्वतःहून अनुष्ठाने, धार्मिक विधी आदी माध्यमांतून साहाय्य करत आहेत.
२९. भावी हिंदु राष्ट्राचे दायित्व, तसेच धर्मसत्तेची धुरा सांभाळण्यासाठी पुढील पिढ्यांना सक्षम करणे
२९ अ. साधनेचा संस्कार दृढ झालेले शेकडो धर्मप्रसारक आणि धर्मरक्षक-साधक सिद्ध करणे
२९ आ. विविध सेवाक्षेत्रांतील (आध्यात्मिक संशोधन, ग्रंथनिर्मिती, कला, ध्वनीचित्रीकरण आदी क्षेत्रांतील) अनेक साधकांना ते ते कार्य उत्तमरित्या चालवण्यासाठी सक्षम करणे
२९ इ. गोपीभाव (कृष्णभक्तीमध्ये रममाण होणे) असलेल्या साधिकांना समष्टी साधना करण्यास सांगून त्यांची पुढील प्रगती करवून घेणे
२९ ई. दैवी (सात्त्विक) बालकांना भावी हिंदु राष्ट्र सांभाळण्याच्या दृष्टीने सक्षम करणे : ईश्वराने गेल्या काही वर्षांत उच्च लोकांतील शेकडो जिवांना पृथ्वीवरील अनेक देशांत जन्माला घातले आहे. जन्मतःच आध्यात्मिक पातळी चांगली असलेली ही बालके ‘दैवी बालके’ आहेत. ‘त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना विविध सेवा शिकवणे आणि पुढील टप्प्याची साधना सांगून त्यांची संतपदापर्यंत वाटचाल करवून घेणे’, या प्रकारे त्यांना हिंदु राष्ट्र सांभाळण्याच्या दृष्टीने सक्षम करणे चालू आहे.
(संपूर्ण परिचयासाठी वाचा – सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सर्वांगीण कार्याचा संक्षिप्त परिचय’ आणि पहा – सनातनचे संकेतस्थळ ‘www.Sanatan.org’)
परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘स्वतःचे कार्य आणि वैशिष्ट्ये यांविषयीचा
परिचय’ वाचल्यावर त्यांच्या मनात ईश्वराप्रती निर्माण झालेला कृतज्ञताभाव !
‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अद्वितीय कार्य आणि वैशिष्ट्ये यांचा संक्षिप्त परिचय !’ हा माझ्याविषयीचा लेख वाचल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘एवढ्या अल्प कालावधीत एवढे विविधांगी कार्य माझ्या हातून कसे घडले ? ग्रंथलेखन; चित्रकला, संगीत आदी कला; आश्रमाच्या वास्तूचे निर्माणकार्य यांसारख्या अनेक क्षेत्रांत शिक्षण घेतलेले नसतांनाही मी त्या त्या क्षेत्रातील साधकांना आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शन कसे करू शकतो ? प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे मला खोलीच्या बाहेर जाणे कठीण होत असतांनाही राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्याच्या अभिनव कल्पना मला कशा काय सुचतात ? कित्येक राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी मला पाहिलेले नसतांनाही त्यांच्या मनात माझ्याविषयी पूज्य भाव कसा निर्माण होतो आणि ते सनातनच्या कार्याशी कसे काय जोडले जातात ?’ या सर्वांचे उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे ‘साधना’ ! मी साधना करत असल्याने देवच मला त्या त्या वेळी योग्य ते सुचवत असतो. ‘चालविसी हाती धरोनिया ।’, यानुसार देवच जणू माझा हात धरून मला पुढे नेत आहे. पूर्वी साधकांनी प्रश्न विचारल्यावर माझ्याकडून त्यांना आपोआप उत्तरे दिली जात असत. पुढे पुढे माझ्या मनात एखादा प्रश्न निर्माण झाला की, लगेच देव मला त्या प्रश्नाचे उत्तरही सुचवत असे. आता मनात प्रश्नही निर्माण न होताच आपोआपच योग्य ते सुचत जाते आणि त्याप्रमाणे कृती केल्यावर कार्य चांगले होते. थोडक्यात ‘इदं न मम ।’ (भावार्थ : हे माझ्यामुळे झाले नाही.) याची जणू देव मला सारखी प्रचीती देत आहे. यामुळे ‘मी पुष्कळ कार्य करतो. माझी पुष्कळ प्रसिद्धी व्हावी’, यासारखा अहंपणाही माझ्यात निर्माण होऊ नये, याची देवच काळजी घेत आहे. यासाठी मी देवाच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
संत रहीम यांचे सुवचन अनुभवणारे (परात्पर गुरु) डॉ. आठवले !
‘संत रहीम यांचे ‘एकै साधे सब सधै ।’, म्हणजे ‘एक साध्य केल्यावर सर्व साध्य होते’, हे सुवचन मी प्रतिदिन अनुभवतो. माझ्या संदर्भात ‘एक साध्य’, म्हणजे ‘ईश्वराचा आशीर्वाद’ आणि ‘सर्व साध्य’, म्हणजे विविध विषयांच्या अंतर्गत सेवा करता येणे, उदा. चित्रकला, संगीत, मूर्तीकला, शास्त्रीय संशोधन इत्यादी अनेक विषयांची काहीही माहिती नसतांना त्या संदर्भात मी साधकांना मार्गदर्शन करू शकतो.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.