सनातन संस्थेच्या वतीने मंगळूरू येथे धर्मप्रेमींसाठी राज्यस्तरीय शिबिर

डावीकडून श्री. काशिनाथ प्रभु आणि मार्गदर्शन करतांना पू. रमानंद गौडा

मंगळूरू – येथील सनातनच्या सेवाकेंद्रामध्ये अलीकडेच धर्मप्रेमींसाठी कर्नाटक राज्यस्तरीय शिबिर अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिरामध्ये बागलकोट, बादामी, विजयपूर, हुब्बळ्ळी, उत्तर कन्नड, उडुपी, दक्षिण  कन्नड, हासन, तुमकूरू आणि बेंगळूरू जिल्ह्यातील सर्व जण अगदी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये सनातनचे संत पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्थिती होती.

या शिबिरात प्रामुख्याने स्वभावदोष आणी अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी तात्त्विक माहिती सांगण्यात आली. त्यानंतर गट करून प्रायोगिक भाग घेण्यात आला. या वेळी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता आणि त्यासाठी लागणारे आवश्यक गुण’, आपत्काळाचे स्वरूप, व्यष्टी आणि समष्टी साधना याविषयी पू. रमानंद गौडा आणि श्री. काशिनाथ प्रभु यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. पू. रमानंद गौडा यांच्या उपस्थितीमुळे शिबिरार्थींना भावाची स्थिती अनुभवता आली.

या शिबिरात जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

१. एका शिबिरार्थीची दुसर्‍या दिवशी परीक्षा असूनसुद्धा तो शिबिरामधे सहभागी झाला होता.

२. एक शिबिरार्थी वैयक्तिक प्रवासाला जाण्याचे रहित करून शिबिरामध्ये सहभागी झाला  होता.

३. शिबिराचे आयोजक आणि उत्तरदायी साधक शिबिरात झालेल्या चुकांविषयी सर्वांसमोर क्षमायाचना करत होते. ते पाहून धर्मप्रेमींनीही सामूहिक क्षमायाचना केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment