राजस्थानमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदु राष्ट्र संपर्क अभियान

राजस्थानमधील जयपूर, सवाई माधोपूर, करोली आणि दौसा जिल्ह्यांमधील धर्मप्रेमींमध्ये हिंदुत्वाचा जागर !

१. श्री. चेतन राजहंस आणि २. श्री. आनंद जाखोटिया यांना राधाकृष्णाची प्रतिमा देतांना करोलीचे धर्मप्रेमी

जयपूर – कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अलीकडेच संयुक्तपणे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान राबवले. या अभियानाच्या अंतर्गत जयपूर, सवाई माधोपूर, दौसा आणि करोली या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्याचे समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राज्यभर धर्मप्रेमींच्या भेटीगाठी घेतल्या, तसेच काही ठिकाणी धर्मप्रेमींना संबोधित केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment